आई अशिक्षित, वडील दहावी पास; पण शेतकऱ्याच्या मुलानं करून दाखवलं, वर्दीवर घरी परतला अन् अख्ख्या गावानं केलं स्वागत
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
अशोक भील या जवानाची आई निरक्षर आहे. तर त्याचे वडील केसराराम दहावी पास आहेत.
मनमोहन सेजू, प्रतिनिधी
बाडमेर : एक काळ असा होता जेव्हा आदिवासी समूहातकील लोक शेती आणि शिकारी हाच आपला प्रमुख व्यवसाय मानायचे. मात्र, काळानुसार अनेक चांगले बदल होताना दिसत आहे. अशीच एक सुखद घटना समोर आली आहे. भिल्ल समाजातील शेतकऱ्याचा पोरगा सीआरपीएफमध्ये भरती झाला. सैन्यदलाच्या वर्दीमध्ये जेव्हा तो घरी आला तेव्हा सर्वांच्या आनंदाला उधाण आले. जाणून घेऊयात, जा तरुणाची प्रेरणादायी कहाणी.
advertisement
अशोक भील असे या जवानाचे नाव आहे. तो बाडमेरच्या एका लहानशा गंगाला या गावातील रहिवासी आहे. सध्या त्याची ट्रेनिंग सुरू आहे आणि नुकताच तो बिहारच्या नालंदा येथे सुरू असलेल्या सीआरपीएफच्या ट्रेनिंग दरम्यान घरी परतला आहे. त्याचे वडील केसराराम आणि आई मटका देवी यांच्यासाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. संपूर्ण गाव त्याच्या स्वागतासाठी जमा झाले होते.
advertisement
अशी केली तयारी -
अशोक भीलने जोधपुरमध्ये आपली लेखी परीक्षा आणि फिजिकल क्लिअर केल्यानंतर नालंदामध्ये सीआरपीएफच्या ट्रेनिंगची सुरुवात केली. 4 भाऊ बहिणींच्या कुटुंबात अशोकने बारावीपर्यंतचे शिक्षण सुरू केले. तसेच कॉलेजला असताना दुसऱ्या वर्षाला असतानाच सीआरपीएफमध्ये निवड झाली.
advertisement
आई निरक्षर, पिता दहावी पास -
view commentsअशोक भील या जवानाने लोकल18 शी बोलताना सांगितले की, मी भिल्ल समाजातील पहिला असा व्यक्ती आहे, ज्याची निवड सीआरपीएफमध्ये झाली आहे. अशोक भील या जवानाची आई निरक्षर आहे. तर त्याचे वडील केसराराम दहावी पास आहेत. अशा वेळी मार्गदर्शनाच्या कमतरेमुळे प्रतिभा आणि टॅलेंट असलेल्या मुले मागे राहून जातात. मात्र, त्याने बारावीच्या शिक्षणानंतर वर्धमान महावीर ओपन विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि द्वितीय वर्षाला असतानाच त्याची निवड झाली.
Location :
Barmer,Rajasthan
First Published :
May 01, 2024 4:15 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
आई अशिक्षित, वडील दहावी पास; पण शेतकऱ्याच्या मुलानं करून दाखवलं, वर्दीवर घरी परतला अन् अख्ख्या गावानं केलं स्वागत


