FYJC Admission: उरले फक्त 3 दिवस, अकरावी प्रवेशासाठी लगेच करा ऑनलाईन नोंदणी
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
FYJC Admission: अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत फक्त 3 दिवस उरली असून लगेच ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे.
पुणे : राज्यातील सर्व महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन नाव नोंदणी सुरू आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी फक्त 3 दिवसांची मुदत उरली असून 15 मेपूर्वी विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी लागेल. सर्व महाविद्यालयांना https://mahafyjcadmissions.in अधिकृत संकेतस्थळावरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. त्यानंतर शिक्षण उपसंचालक लॉगिनद्वारे ही माहिती तपासून अंतिम करणार आहेत. याबाबत शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी माहिती दिलीये.
अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी कोणताही विलंब होऊ नये यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. महाविद्यालयांनी आपली माहिती अचूक व पूर्णपणे अद्ययावत करणे अत्यावश्यक असून तशा सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या महाविद्यालयांनी अद्याप नोंदणी पूर्ण केलेली नाही किंवा अद्ययावत केलेली नाही, त्यांनी तत्काळ आवश्यक ती कार्यवाही करणे गरजेचे आहे. तरच अंतिम मुदतीपूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे आवाहन करण्यात आलेय.
advertisement
इथं साधा संपर्क
कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण आल्यास किंवा शंका असल्यास महाविद्यालयांनी 8530955564 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच support@mahafyjcadmissions.in या ई-मेलद्वारे संपर्क साधता येणार आहे.
दहावीचा निकाल 13 मे रोजी
दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. 13 मे रोजी सकाळी 11 वाजता निकाल जाहीर होईल. https://mahahsscboard.in/ , https://mahresult.nic.in/ , https://sscresult.mkcl.org/ या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
May 12, 2025 2:06 PM IST