advertisement

Education: हॉस्टेलचा प्रवेश हुकला, खर्चाची काळजी वाटतेय? सरकार देणार 60,000 रुपये

Last Updated:

Education: वसतिगृहाचा खर्च परवडणारा असल्यामुळे बहुतांशी विद्यार्थ्यांचा वसतिगृहाकडेच कल असतो. पण, काही कारणांमुळे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही तर त्यांचं शिक्षण अपूर्ण राहण्याची शक्यता असते.

Education: हॉस्टेलचा प्रवेश हुकला, खर्चाची काळजी वाटतेय? सरकार देणार 60,000 रुपये
Education: हॉस्टेलचा प्रवेश हुकला, खर्चाची काळजी वाटतेय? सरकार देणार 60,000 रुपये
पुणे: अनेक गाव-खेड्यांतील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी आपलं गाव सोडून शहरात येतात. शहरांमध्ये राहण्याचा आणि जेवणाचा खर्च जास्त असतो. अनेकांना हा खर्च परवडत नाही त्यामुळे ते शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतात. वसतिगृहाचा खर्च परवडणारा असल्यामुळे बहुतांशी विद्यार्थ्यांचा वसतिगृहाकडेच कल असतो. पण, काही कारणांमुळे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही तर त्यांचं शिक्षण अपूर्ण राहण्याची शक्यता असते. अशा विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून 'ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना' राबवली जात आहे.
कशी आहे ज्ञानज्योती आधार योजना?
सरकारकडून विद्यार्थ्यांसाठी 'ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना' राबवली जात आहे. या योजनेचा लाभ इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळू शकतो. अर्ज करण्याची ऑनलाइन मुदत 18 ऑगस्ट 2025 पर्यंत आहे. पात्र विद्यार्थ्यांना 60,000 रुपये आर्थिक सहाय्य मिळू शकते. ही योजना आदिवासी विकास विभागाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम आणि सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या धर्तीवर राबवली जात आहे.
advertisement
पात्रता निकष
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्यासाठी काही ठराविक निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्ज करणारा विद्यार्थी बारावीनंतरचं शिक्षण घेत असावा. अर्ज करताना त्याच्याकडे किमान 60 टक्के गुणांचं किंवा ग्रेडेशन प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. पालकाचं वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे. विद्यार्थी शैक्षणिक संस्था असलेल्या शहर किंवा तालुक्यातील रहिवासी असावा.
advertisement
अर्ज कसा करावा?
विद्यार्थी संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक संचालक (इतर मागास बहुजन कल्याण) यांच्याकडे ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज सादर करू शकतात. अर्ज डाउनलोड करून सर्व माहिती भरावी आणि आवश्यक कागदपत्रांसह जमा करावा.
आवश्यक कागदपत्रे
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करताना काही कागदपत्रे आवश्यक आहेत. अर्जदाराकडे महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र, मागास प्रवर्ग / विमुक्त जाती / भटक्या जमाती / विशेष मागास प्रवर्गाचा जातीचा दाखला असला पाहिजे. अनाथ विद्यार्थ्यांसाठी महिला व बालकल्याण विभागाचे अनाथ प्रमाणपत्र आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जिल्हा शल्य चिकित्सकाचे प्रमाणपत्र (40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याचे) आवश्यक आहे. तसेच, माहिती खरी असल्याचं स्वयंघोषणापत्र, कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतल्याचं शपथपत्र, भाडे चिठ्ठी व भाडे करारपत्र आणि महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा जोडणे आवश्यक आहे.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
Education: हॉस्टेलचा प्रवेश हुकला, खर्चाची काळजी वाटतेय? सरकार देणार 60,000 रुपये
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement