अशी सरकारी नोकरी पुन्हा मिळणार नाही, पगार 70000, नो परिक्षा पोहोचला थेट मुलाखतीला!

Last Updated:

उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत 11 जुलै 2024 देण्यात आली आहे. याचाच अर्थ 11 जुलैपर्यंत येणारे अर्ज हे भरतीसाठी ग्राह्य धरण्यात येतील.

(प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
मुंबई: सरकारी नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्या तरुणांसाठी चांगली बातमी आहे. ऑइल इंडिया लिमिटेड या सरकारी कंपनीमध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. कंपनीनं केमिस्ट या पदाच्या रिक्त असणाऱ्या जागांवर भरती प्रक्रिया सुरू केली असून, रिक्त जागांची संख्याही जाहीर केलीय. या पदासाठी पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. ऑइल इंडिया कंपनीच्या अधिकृत वेबसाइट oil-india.com वर जाऊन भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत 11 जुलै 2024 देण्यात आली आहे. याचाच अर्थ 11 जुलैपर्यंत येणारे अर्ज हे भरतीसाठी ग्राह्य धरण्यात येतील. भरती प्रक्रियेसाठी नेमकी पात्रता काय आहे? कोणाला अर्ज करता येईल? भरती प्रक्रिया कशी होणार आहे? नियुक्ती झाल्यानंतर उमेदवारांना किती पगार देण्यात येईल, याबाबत जाणून घेऊ.
उमेदवाराचं वय किती असावं?
ऑइल इंडिया कंपनीत केमिस्ट या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय किमान 24 वर्षं आणि कमाल 40 वर्षं असावं. वयोमर्यादेबाबत कंपनीने अधिक माहिती त्यांच्या वेबसाइटवर दिली आहे.
advertisement
कोण अर्ज करू शकेल?
केमिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून रसायनशास्त्र (केमिस्ट्री) विषयात किमान दोन वर्षं कालावधीची पदव्युत्तर पदवी म्हणजे मास्टर डिग्री उत्तीर्ण केलेली असावी. तसंच उमेदवाराला औद्योगिक किंवा संस्था किंवा संशोधन प्रयोगशाळेत किमान एक वर्ष कामाचा अनुभव असावा. उमेदवारानं हा अनुभव त्याची मास्टर डिग्री पूर्ण झाल्यानंतर घेतलेला असावा.
advertisement
किती मिळेल पगार?
ऑइल इंडिया कंपनीच्या भरती प्रक्रियेद्वारे केमिस्ट पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला प्रति महिना 70 हजार रुपये पगार दिला जाणार आहे.
अशी होईल निवड
ऑइल इंडिया भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांची निवड इंटरव्ह्यूच्या आधारे केली जाईल. अर्ज करण्याची मुदत संपल्यानंतर पात्र उमेदवारांना इंटरव्ह्यूसाठी ऑइल इंडिया लिमिटेड, सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर एनर्जी स्टडीज, पाचवा मजला, एनआरएल सेंटर, 122ए ख्रिश्चन वस्ती, जी. एस. रोड, गुवाहाटी, आसाम इथे बोलावण्यात येणार आहे. इंटरव्ह्यूसाठी उमेदवारांनी प्रत्यक्ष हजर राहणं गरजेचं आहे. इंटरव्ह्यूद्वारे उमेदवारांची नोकरीसाठी अंतिम निवड करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही ऑइल इंडिया कंपनीची अधिकृत वेबसाइट oil-india.com यावर भेट देऊ शकता.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
अशी सरकारी नोकरी पुन्हा मिळणार नाही, पगार 70000, नो परिक्षा पोहोचला थेट मुलाखतीला!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement