IIT आणि UPSC चा नाद सोडला अन् शायरीत बनवलं करिअर, आता कुशल करतोय लाखोंची कमाई
- Published by:Khushalkant Dusane
Last Updated:
कुशलने सांगितले की, कवींची अवस्था आधीपेक्षा आता चांगली झाली आहे. आता कवी कविता वाचण्यासाठी हवे तेवढे पैसे मागतात.
गौहर, प्रतिनिधी
दिल्ली : तुम्हाला सर्वांना माहिती आहे की, सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यातच आता ‘यहां तुम देखना रुतबा हमारा, हमारी रेत है दरिया हमारा, किसी से कल पिताजी कह रहे थे, मोहब्बत खा गई लड़का हमारा’ ही शायरी सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या शायरीला लिहणाऱ्या आणि वाचणाऱ्याचे नाव कुशल दौनेरिया असे आहे. कुशल हा सध्या लाखो रुपयांची कमाई करतो. त्याचा प्रवास हा नक्कीच प्रेरणादायी आहे. पण नेमका कुशल कोण आहे, तो काय करतो, हे जाणून घेऊयात.
advertisement
लोकल18 च्या टीमने सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या अशा कुशल दौनेरिया या तरुणाशी संवाद साधला. यावेळी लोकल18 शी बोलताना त्याने सांगितले की, लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात त्याने शायरी लिहायला सुरुवात केली. त्याने इतिहास या विषयात मास्टर्स पूर्ण केले आहे. त्याआधी त्याने आयआयटी आणि यूपीएससीची परीक्षा दिली होती. मात्र, तो या परीक्षेत नापास झाला होता. यानंतर त्याने लिहायला सुरुवात केली. आता तो पूर्णपणे शायरी लिहितो.
advertisement
महिन्याला 1 लाख रुपयांची कमाई -
कुशलने सांगितले की, कवींची अवस्था आधीपेक्षा आता चांगली झाली आहे. आता कवी कविता वाचण्यासाठी हवे तेवढे पैसे मागतात. विशेष म्हणजे तेवढे पैसे त्यांना मिळतही आहेत. पण आधी असे नव्हते. एक उदाहरण देताना त्याने सांगितले की, तो एका महिन्यात फक्त 5 ते 6 मुशायरे करतो. यातून तो साधारण एका महिन्यात एक लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करतो.
advertisement
आचारसंहितेचे नियम काय असतात, कोणत्या गोष्टींचं करावं लागतं पालन, अत्यंत महत्त्वाची माहिती
कुशलने पुढे सांगितले की, या संपूर्ण प्रवासात काही क्षण त्याच्यासाठी विशेष आणि अत्यंत महत्त्वाचे राहिले आहेत. यामध्ये पहिला मोठा क्षण म्हणजे, त्याच्या आयुष्यात काही दिवसांपूर्वीच आला होता. पाकिस्तानातील प्रसिद्ध शायर तहजीब हाफी यांनी त्याचे काही शेर इंस्टाग्राम लाईव्हवर वाचले होते. हे नंतर व्हायरलही झाले होते.
advertisement
यासोबतच त्याने सांगितले की, काही महिन्यांपूर्वी एका मुशायराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भारतातील सर्वात मोठ्या शायरांनी सहभाग घेतला होता. यामध्ये अजहर इकबाल आणि शारिक कैफी यांसारख्या मोठ्या शायरांचा समावेश होता. या कार्यक्रमात त्यालाही सहभागी होण्याची संधी मिळाली होती, असे त्याने सांगितले.
Location :
Delhi
First Published :
March 20, 2024 2:20 PM IST