दूध डेअरी व्यवसायातून होतेय लाखोंची कमाई, कसं केलं नियोजन? Video
- Published by:News18 Marathi
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
सध्याच्या काळात कृषी आणि कृषीपुरक व्यवसायाकडे अनेकांचा कल वाढतोय. दूध डेअरी किंवा दूध संकलन केंद्र सुरू करून चांगला नफा मिळवता येऊ शकतो.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : योग्य नियोजन, कामाची आवड असल्यास कोणताही व्यवसाय यशस्वी करता येऊ शकतो. सध्याच्या काळात अनेक तरुण उद्योग आणि व्यवसायाकडे वळत आहेत. शेती आणि शेतीपुरक व्यवसांकडे अनेकांचा कल आहे. यात दुग्धव्यवसाय हा चांगला फायदा मिळवून देणारा आहे. दूध डेअरी किंवा दूध संकलन केंद्र सुरू करून चांगला नफा मिळवता येऊ शकतो. पुण्यातील दारुंब्रे येथील दूध डेअरी व्यावसायिक संदीप सोरटे यांनी या व्यवसायाबाबत माहिती दिलीय.
advertisement
हिंजवडीजवळच्या दारुंब्रे येथे 5 वर्षांपूर्वी संदीप सोरटे यांनी दूध व्यवसाय सुरू केला. त्यापूर्वी ते दुसऱ्या एका डेअरीला दूध घालत होते. यानंतर त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. जवळपासच्या शेतकऱ्यांना भेटून दूध गोळा करण्यास सुरुवात केली. आता या व्यवसायातून महिन्याकाठी 50 हजारांहून अधिकचा नफा मिळत असल्याचे सोरटे सांगतात.
advertisement
दूध डेअरी सुरू करण्याचा खर्च
दूध डेअरी सुरू करण्यासाठी पहिल्यांदा फॅट मशीन, काटा, बोरकुलर आणि फ्रिज या वस्तू घ्याव्या लागतात. दूध संकलन जास्त असल्याने 8 लाख रुपयांपर्यंत खर्च आला. परंतु, छोट्या प्रमाणात हा व्यवसाय करण्यासाठी फ्रीज, चार कँड, फॅट मशीन घेऊन 2 लाख रुपये खर्चात व्यवसाय सुरू होऊ शकतो, असे सोरटे यांनी सांगितले.
advertisement
कसं केलं नियोजन?
view commentsसुरुवातीला 100 ते दीडशे लिटर दूध होतं. हळूहळू ते वाढत गेलं. आता गाई व म्हैस धरून सोळाशे लिटर दूध खरेदी विक्री केली जाते. म्हशीच्या दुधाची फॅट ही साडेपाच ते दहा पर्यत बसते. 6.0 ते 9.0 फॅट असेल त्या दुधाचे दर हे 52 रुपये लिटर इतके आहे. तर गाईच्या दुधासाठी 32 रुपये भाव दिला जातो. एका लिटर मागे 3 रुपयेचा नफा व्यवसायिकाला होत असतो. विक्री करणे त्याची ने आण करणे हा खर्च जातो. तरीही यातून 40 ते 50 हजार रुपये नफा मिळवता येतो, अशी माहिती शिव दूध डेअरीचे मालक संदीप सोरटे यांनी दिली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
May 29, 2024 8:04 PM IST

