भिक मागणारे हात आत्ता बनवत आहेत सुंदर पोशाख, झोपडपट्टीतील महिलांना कसा मिळाला रोजगार?

Last Updated:

नागपूरची रहाटेनगर टोळी झोपडपट्टी नेहमीच चर्चेत असते. या झोपडपट्टीतील भीक मागायला, कचरा वेचायला जाणाऱ्या मुलींना शिलाई मशीनचे प्रशिक्षण देत खुशाल ढाक याने रोजगाराचा मार्ग खुला करून दिला आहे. 

+
News18

News18

वृषभ फरकुंडे,प्रतिनिधी 
नागपूर : तिमिरातुनी तेजाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. शिक्षणाद्वारे जीवनातला आणि मनातला अंधार दूर करता येतो, हे एका तरुणाच्या लक्षात आलं. आणि त्याचा संघर्ष सुरू झाला. आज हा तरुण झोपडपट्टीतील मुलांसाठी एक आशेचा किरण बनला आणि त्यामुळे त्यांचे जीवन उजळून निघाले आहे. अवैध दारूविक्री, गुन्हेगारी अशा कारणांमुळे नागपूरची रहाटेनगर टोळी झोपडपट्टी नेहमीच चर्चेत असते. या झोपडपट्टीतील भीक मागायला, कचरा वेचायला जाणाऱ्या मुलींना शिलाई मशीनचे प्रशिक्षण देत खुशाल ढाक याने रोजगाराचा मार्ग खुला करून दिला आहे.
advertisement
रोजगार मिळावा यासाठी शिलाई मशीनचे प्रशिक्षण
खुशाल ढाक हा सेवा सर्वदा बहुउद्देशीय संस्थेचा संचालक आहे. खुशालने सांगितले की, मी जिथे काम करतो ती गरिब वसाहत आहे. भीक मागणे, अवैध दारू बनवणे, चोरी करणे असे काम येथील लोकांचे आहे. या आधी मी येथील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलेले आहे. त्यामुळे महिलांनी भीक मागणे, अवैध दारू बनवणे, चोरी करणे या व्यवसायातून बाहेर पडून चांगले काम करावे, अशी माझी इच्छा होती. यामुळे महिलांना चांगला रोजगार मिळावा यासाठी पत्नीच्या मदतीने मी शिवण क्लास सुरू केला. मी माझ्या पत्नीला घेऊन परिसरातील महिला आणि मुलींना चांगला रोजगार मिळावा यासाठी शिलाई मशीनचे प्रशिक्षण दिले. यावेळी आम्हाला अनेक अडचणींचाही सामना करावा लागला.
advertisement
शिसवी लाकूड अन् सागवानाच्या घर सजावटीसाठी आकर्षक वस्तू, 10 रुपयांत करा इथं खरेदी Video
खुशाल पुढे बोलताना म्हणाला की, मी विचार केला की, ज्या चौकात महिला भीक मागायच्या त्याच चौकात आपण रोजगार का नाही द्यावा. म्हणून त्याच कॉलनीत मी एक दुकान शोधून बुटीक सुरू केले. ज्या महिला, मुली या चौकात भीक मागायच्या, त्या आज स्वतःचा पायावर उभ्या आहेत ही बाब त्यांच्यासाठी खूप अभिमानाची आहे, असेही तो म्हणाला.
advertisement
खिशात 22 रुपये असताना सुरू केला खारे शेंगदाणे विक्रीचा व्यवसाय, आता लाखोंची कमाई, साताऱ्यातील सतीश यांची यशस्वी कहाणी
अमिषा लोंडे यांनी सांगितले की, मी रहाटेनगर टोळी झोपडपट्टीमध्ये राहते. यापूर्वी छत्रपती चौकात दिवसभर भीक मागायचे. पण जेव्हा आम्हाला ढाक सर भेटायला आले, त्यावेळी त्यांनी सांगितले की, दिवसभर भीक मागून जगण्यापेक्षा, तुम्ही स्वतःच्या व्यवसाय सुरु करू शकता. म्हणून त्यांनी आमच्यासाठी हे बुटीक सेंटर उघडलं आणि आम्हाला ट्रेनिंग दिलं. आमच्या बुटीकमध्ये, सलवार सूट, प्लाझो, डिझायनर सूट, ब्लाउज, कुर्ती, शाळेचा गणवेश आम्ही शिवतो. यामधून आम्हाला दर महिन्याला 5 ते 6 हजार रुपये मिळतात, असं अमिषा यांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
भिक मागणारे हात आत्ता बनवत आहेत सुंदर पोशाख, झोपडपट्टीतील महिलांना कसा मिळाला रोजगार?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement