HSC Result 2025 : बारावीच्या परीक्षेत शेतकऱ्याच्या मुलीचे घवघवीत यश, कोणतेही क्लास न करता मिळवले 95 टक्के गुण, Video

Last Updated:

राज्यात बारावीचा निकाल जाहीर झाला असून यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. पुण्यातील प्रतिष्ठित फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थिनी माया माने हिने आर्ट्स शाखेतून 95 टक्के गुण मिळवत लक्षणीय यश संपादन केले आहे.

+
बारावी

बारावी निकाल 

पुणे : राज्यात बारावीचा निकाल जाहीर झाला असून यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. यंदा बारावीच्या निकालात कोकण विभागानं बाजी मारली आहे. तर सर्वात कमी निकाल हा लातूर विभागाचा लागला आहे. पुण्यातील प्रतिष्ठित फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थिनी माया माने हिने आर्ट्स शाखेतून 95 टक्के गुण मिळवत लक्षणीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे माया ही मूळची धाराशिव जिल्ह्यातील विठलवाडी या छोट्याशा गावातील असून, तिचे आई-वडील शेतकरी आहेत.
मायाने कोणताही खासगी क्लास न लावता केवळ महाविद्यालयात शिकवले जाणारे विषय समजून घेत, नियमित अभ्यास करत हे यश मिळवले आहे. ती दररोज दोन ते तीन तास अभ्यास करत असे. मी फक्त कॉलेजमध्ये दिले जाणारे लेक्चर ऐकून व पुस्तकं वाचूनच अभ्यास केला. एवढे मार्क्स मिळतील असं कधी वाटलं नव्हतं,असं माया सांगते.
advertisement
तिच्या यशामुळे तिचं सर्वत्र कौतुक होत असून, तिच्या घरच्यांनाही यावर विश्वास बसत नाही. वडिलांना इतका आनंद झाला आहे की, त्यांना वाटतं हे गुण त्यांनीच मिळवले आहेत, असे ती हसत सांगते.
मायाला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायची इच्छा आहे आणि ती यशाची पुढची पायरी गाठण्याचा निश्चय करत आहे. एका छोट्याशा गावातून येऊन, कोणतीही विशेष सुविधा नसताना मिळवलेलं हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शिक्षणासाठी जिद्द, सातत्य आणि मेहनत असेल तर कोणतीही अडचण यशाच्या वाटेवर अडथळा ठरू शकत नाही, हे मायाने आपल्या कृतीतून सिद्ध केलं आहे.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
HSC Result 2025 : बारावीच्या परीक्षेत शेतकऱ्याच्या मुलीचे घवघवीत यश, कोणतेही क्लास न करता मिळवले 95 टक्के गुण, Video
Next Article
advertisement
Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement