IIT ची तयारी करणाऱ्या तरुणाचं नशिबंच बदललं, सोशल मीडियानं अल्पावधीतच बनवलं स्टार

Last Updated:

लोकल18 शी बोलताना त्याने सांगितले की, तो आयआयटीची तयारी करण्यासाठी दिल्लीला गेला होता. तसेच त्याचे काही मित्रही होते.

हिमांशु आणि त्याची टीम
हिमांशु आणि त्याची टीम
अभिनव कुमार, प्रतिनिधी
दरभंगा : बिहारमधील एक तरुण रोजगाराच्या शोधात दिल्ली येथे आला. मात्र, त्याच्या नशिबात काही वेगळेच लिहिले होते. कोरोना काळात आपल्या मित्रांसोबत बसलेला असताना त्याने एक गाणे गायले आणि हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर हा तरुण आता शिक्षण सोडून दिल्ली येथे आला आणि देश तसेच जगात आपल्या गाण्यांचे कार्यक्रम सादर करत आहे.
advertisement
इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावर इतके फॉलोअर्स -
या तरुणाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स बद्दल बोलायचे झाले तर फेसबुकवर 1 लाख 5 हजार आणि इन्स्टाग्रामवर 55 हजार फॉलोअर्स झाले आहेत. हिमांशु असे या तरुणाचे नाव आहे.
लोकल18 शी बोलताना त्याने सांगितले की, तो आयआयटीची तयारी करण्यासाठी दिल्लीला गेला होता. तसेच त्याचे काही मित्रही होते. अशातच लॉकडाऊन लागले आणि अभ्यासही घरूनच होऊ लागला. तसेच तिथे आर्थिक समस्याही जाणवू लागली. त्यामुळे तो घरी परतला आणि घरी येऊन त्याने सर्व मित्रांसोबत लॉकडाऊनवर काही गाणे तयार केले आणि यावर काम सुरू केले.
advertisement
गाणे तयार करायला 2020 मध्ये सुरुवात -
हिमांशुने पुढे बोलताना सांगितले की, 2020 मध्ये आम्ही काम सुरू केले होते आणि 2022 मध्ये एक गाणे व्हायरल झाले. ‘मैसेंजर पर मैसेज करबाऊ , दिल के हमर मलकाइन की तू ऑनलाइन रही हें’ हे मैथिली भाषेतील ते गाणे होते. हे गाणे खूप व्हायरल झाले. तेव्हापासून हिमांशू आणि त्याच्या टीमचे नशिबच उजळले.
advertisement
मैथिली भाषेत हंगामी गाणे गाण्यासाठी हे ओळखले जातात. त्यांची तयारी नेहमी हंगामी गाण्यांवर असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक तरुण आता आपले करिअर बनवू लागले आहेत. यासोबतच चांगला नफाही मिळवू लागले आहेत, असेच यावरुन म्हणता येईल.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
IIT ची तयारी करणाऱ्या तरुणाचं नशिबंच बदललं, सोशल मीडियानं अल्पावधीतच बनवलं स्टार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement