आईने मुलींच्या लग्नात दिला 11 कोटी 51 लाख रुपयांचा हुंडा, अविश्वसनीय अन् अद्भुत...
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
महवा येथील एका महिलेने 10 मे रोजी आपल्या पाच मुलींचे लग्न एकाच वेळी केले. या मुलींना वडील नाही. आई विधवा आहे.
कालू राम जाट, प्रतिनिधी
दौसा : हुंडा ही समाजातील एक अत्यंत वाईट प्रथा आहे. मात्र, काही आई वडील आनंदाने आपल्या मुलीला चांगल्या भेट वस्तूंसह पाठवणी करतात. पण अशा घटना फार दुर्मिळ असतात. यातच आता अशी एक घटना समोर आली आहे, जी वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
एका आईने आपल्या मुलींना तब्बल साडे अकरा कोटींचा हुंडा दिला आहे. ही महिला विधवा आहे. तसेच या महिलेकडे रोजगाराचे कुठलेही साधन नाही. असे असताना या महिलेने आपल्या मुलींना तब्बल साडे अकरा कोटींचा हुंडा दिला आहे. राजस्थानमधील दौसा येथील या विवाह सोहळ्याची आता सर्वत्र चर्चा होत आहे. अद्याप लोकल18 ची याबाबत कोणताही दावा करत नाही.
advertisement
लग्नात 11 कोटी 51 लाख रुपयांचा हुंडा दिल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महवा येथील एका महिलेने 10 मे रोजी आपल्या पाच मुलींचे लग्न एकाच वेळी केले. या मुलींना वडील नाही. आई विधवा आहे.
महवा येथील काही लोकांचे म्हणणे आहे की, महिलेची महवा येथे प्राइम लोकेशनवर 6 बिघा जमीन आहे. त्यांनी आपल्या पाचही मुलींना एक एक बिघा जमनी हुंड्यात दिली आहे. पंच पटेल यांनी जमिनीची किंमत ही 2 कोटी 31 लाख रुपये प्रति बिघा इतकी ठरवली आहे. अशावेळी 5 मुलींच्या लग्नातील हुंड्याची एकूण रक्कम 11 कोटी 51 लाख रुपये आहे. महिलेने एक बिघा जमीन ही स्वत:च्या उपजीविकेसाठी ठेवली आहे.
advertisement
उत्पन्नाचा कोणताही स्त्रोत नाही -
view commentsअसे सांगितले जात आहे की, महिलेजवळ जमिनीशिवाय उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. तसेच तिला मुलगाही नाही. यासाठी या महिलेने आपल्या लाडक्या मुलींना संपूर्ण संपत्ती देऊन टाकली. या लग्नसोहळ्यानंतर सोशल मीडियावर अनेक जण आपापली मते व्यक्त करत आहे. या लग्नाची जोरदार चर्चा होत आहे.
Location :
Dausa,Rajasthan
First Published :
May 14, 2024 9:40 AM IST
मराठी बातम्या/Viral/
आईने मुलींच्या लग्नात दिला 11 कोटी 51 लाख रुपयांचा हुंडा, अविश्वसनीय अन् अद्भुत...


