2 म्हशींपासून सुरू झाला प्रवास, आता महिन्याला 3 लाखांची कमाई, पाहा कसं केलं नियोजन? Video
- Published by:News18 Marathi
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
केवळ दोन पंढरपुरी म्हशींपासून दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. आता किरण शहापूरकर यांची महिन्याला 3 लाखांची कमाई आहे.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना: जिद्द चिकाटी आणि प्रामाणिक कष्टांच्या जोरावर आपण कोणत्याही व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतो. जालन्यातील निधोनाच्या किरण शहापूरकर आणि त्यांच्या दोन बंधूंनी हेच सिद्ध करून दाखवले आहे. आजोबांनी दोन म्हशींपासून सुरू केलेल्या दुग्ध व्यवसायातून त्यांनी मोठी भरारी घेतलीय. सध्या 40 म्हशींच्या पालनातून महिन्याकाठी 3 लाखांचा निव्वळ नफा शहापूरकर बंधूंना होतोय.
शहापूरकर कुटुंब मूळचं सोलापूरचं
मूळचे सोलापूरचे असलेले शहापूरकर कुटुंब 1960 च्या दशकात जालन्यात स्थायिक झाले. किरण शहापूरकर यांचे आजोबा निधोना येथे वास्तव्यास आले. त्यांनी केवळ दोन पंढरपुरी म्हशींपासून दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. या व्यवसायात पुढे किरण यांच्या वडिलांनीही योगदान दिलं. आता त्यांच्या तीन नातवांनी दुग्ध व्यवसाय वाढवला असून तब्बल 40 म्हशींपर्यंत नेला आहे.
advertisement
महिन्याकाठी 3 लाखांची कमाई
या 40 म्हशींपासून दररोज 150 ते 200 लिटर दूध निघते. हॉटेल व्यवसायिक तसेच घरगुती ग्राहकांना 70 ते 80 रुपये प्रति लिटर या दराने या दुधाची विक्री होते. दोन दिवसाला 12 ते 15 हजार रुपये मिळतात. म्हशींसाठी लागणारा चारा आणि इतर खर्च वगळून दहा हजार रुपये निव्वळ हातामध्ये राहतात. अशाप्रकारे महिन्याकाठी निव्वळ तीन लाखांचे उत्पन्न शहापूरकर बंधू कमावत. या उत्पन्नातूनच एक टुमदार घरही बांधल्याचे किरण सांगतात.
advertisement
असं करतात नियोजन
"आमच्या आजोबांनी हा व्यवसाय सुरू केला आणि आम्ही हा व्यवसाय वाढवत नेला. या व्यवसायामध्ये स्वतः काम करावे लागते. इतरांच्या भरोशावर हा व्यवसाय चालत नाही. सकाळी चार वाजता उठून आम्ही म्हशींचे शेण काढणे, त्यांना वैरण देणे तसेच दूध काढण्याचे काम करतो. त्यानंतर एक जण जालना शहरात दुधाची विक्री करण्यासाठी जातो. सकाळी दहा वाजेपर्यंत म्हशींची सगळी कामे आवरतात. 10 वाजेच्या आसपास त्यांना पाणी दिले जाते. त्यानंतर दुपारी 3 वाजता त्यांची वॉशिंग केली जाते. पुन्हा संध्याकाळच्या नियोजनात सुरुवात होते. संध्याकाळी पुन्हा एकदा वैरण टकणे दूध काढणे अशा प्रकारचे नियोजन असतं," असं किरण शहापूरकर यांनी सांगितलं.
advertisement
दरम्यान, नवीन व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांनी स्वतः काम करण्याची तयारी असेल तर या व्यवसायात नक्की यावं, असा आवाहन देखील किरण शहापूरकर यांनी केलंय.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
April 28, 2024 1:23 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
2 म्हशींपासून सुरू झाला प्रवास, आता महिन्याला 3 लाखांची कमाई, पाहा कसं केलं नियोजन? Video

