MBA Placement : नोकरी सोडून केलं MBA; जगातील या सर्वात मोठ्या कंपनीनं तरुणीला दिलं 55 लाखांचं पॅकेज!

Last Updated:

उत्तम पगाराची नोकरी मिळवणे हा एमबीएचा अभ्यास करण्यामागील तरुणांचा हेतू असतो. एमबीए शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आयआयएममधून न शिकता 55 लाख पगाराची नोकरी मिळवली आहे.

कोणत्याही आयआयएम कॉलेजमधून न शिकता हर्षिताला 55 लाख पगाराची नोकरी मिळाली आहे.
कोणत्याही आयआयएम कॉलेजमधून न शिकता हर्षिताला 55 लाख पगाराची नोकरी मिळाली आहे.
मुंबई, 8 सप्टेंबर : आयआयएममधून शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांचा मुख्य उद्देश प्लेसमेंटद्वारे चांगल्या पगाराची नोकरी मिळवणे हा असतो. पण यासोबतच प्लेसमेंटमध्ये मिळणारी नोकरीही विद्यार्थ्यांच्या टॅलेंटवर अवलंबून असते. असाच एक किस्सा रायपूरच्या हर्षिता बांठिया या हुशार विद्यार्थिनीचा आहे. कोणत्याही आयआयएम कॉलेजमधून न शिकता तिला 55 लाख पगाराची नोकरी मिळाली आहे. जगातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्टने हर्षिताला नोकरीची ऑफर दिली आहे.
हर्षिता बांठियाने गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (GIM) मधून एमबीएचे शिक्षण घेतले आहे. तिला मायक्रोसॉफ्टने 55 लाख रुपयांच्या मोठ्या पॅकेजवर नोकरीची ऑफर दिली आहे. ती पीजीडीएमची विद्यार्थिनी आहे. यापूर्वी याच अभ्यासक्रमासाठी सरासरी सॅलरी पॅकेज 14.66 लाख रुपये प्रतिवर्ष होते. या कॉलेजमध्ये येण्यापूर्वी हर्षिता पुण्यातील एका आंतरराष्ट्रीय बँकेत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनीअर म्हणून कार्यरत होती.
advertisement
हर्षिता आहे अभियांत्रिकी पदवीधर
हर्षिता बांठिया छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये आपल्या कुटुंबासह राहते. छत्तीसगडमधील महाविद्यालयातून तिने बी.टेक.चे शिक्षण घेतले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जीआयएमच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “हर्षिताने तिचे व्यवस्थापन कौशल्य सुधारण्यासाठी नोकरी सोडली आणि एमबीए प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन तयारी केली. तिने CAT परीक्षेत चांगले गुण मिळवले आणि अनेक संस्थांमध्ये अर्ज केला.
advertisement
जीआयएमचे संचालक म्हणाले, “विद्यार्थी कल्याण आणि शिक्षणाच्या बाबतीत जीआयएम उद्योगातील उत्कृष्टतेमध्ये नेहमीच आघाडीवर आहे. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना सक्रिय नेतृत्वाची मशाल धरून त्यांच्या करिअरच्या मार्गावर यश मिळविण्यासाठी प्रोत्साहित करतो. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आम्ही आमच्या रिक्रूटर्सच्या पोर्टफोलिओ आणि प्लेसमेंटमध्ये प्रचंड वाढ पाहिली आहे.”
नोकरी मिळवण्यासाठी सर्वोत्कृष्ट महाविद्यालय
GIM ला 2022 साली व्यवस्थापन श्रेणीमध्ये NIRF रँकिंगमध्ये 36 वा क्रमांक मिळाला आहे. 424 पदवीधरांपैकी 407 जणांना शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये नोकरीच्या ऑफर मिळाल्या आहेत. ज्यांना या नोकऱ्या मिळाल्या त्यांचा सरासरी पगार 10 लाख रुपये आहे.
मराठी बातम्या/करिअर/
MBA Placement : नोकरी सोडून केलं MBA; जगातील या सर्वात मोठ्या कंपनीनं तरुणीला दिलं 55 लाखांचं पॅकेज!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement