क्लास लावला नाही, जिद्दीनं केला अभ्यास; शेतकऱ्याचा मुलगा दुसऱ्यांदा बनला हा अधिकारी
- Published by:News18 Marathi
Last Updated:
नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घोषित झालेल्या निकालात राज्य विक्रीकर निरीक्षक (STI) 2023 परीक्षेत प्रतिकने दुसऱ्यांदा यश मिळवले आहे.
साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी
कोल्हापूर : सरकारी अधिकारी बनण्याचे स्वप्न बरेच जण बघत असतात. मात्र त्यासाठी प्रयत्न करणारे खूप कमी असतात. यापैकीच एक आहे कोल्हापुरातील प्रतिक मगदूम. नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घोषित झालेल्या निकालात राज्य विक्रीकर निरीक्षक (STI) 2023 परीक्षेत प्रतिकने दुसऱ्यांदा यश मिळवले आहे. याआधीही प्रतिकने राज्यकर निरीक्षक होण्याचा मान मिळवला असून आता दुसऱ्यांदा तो राज्य विक्रीकर निरीक्षक झाला आहे.
advertisement
कुठं झालं शिक्षण?
प्रतिक मगदूम हा कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील खोची गावचा शेतकरी कुटूंबातील एक तरुण आहे. प्रतिकचे वडील महावीर मगदूम हे शेतीकाम करतात. तर आई निर्मला या घर सांभाळतात. शेती करत वडिलांनी प्रतिकचे सर्व शिक्षण पूर्ण केले आहे. प्रतिकचे दहावीपर्यंतचे शिक्षण त्याच्या खोची या गावातच झाले आहे. त्यानंतर त्याने कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयातून विज्ञान शाखेचे शिक्षण घेतले. पुढे केआयटी, कोल्हापूर अर्थात कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण करून देखील त्याने नोकरी साठी प्रयत्न केला नाही. मनात समाज सेवा करण्याचेच विचार असल्याने शिक्षण पूर्ण करून मग त्या दिशेने अभ्यास आणि प्रयत्न सुरू केल्याचे प्रतिकने सांगितले.
advertisement
क्लास न लावता केला अभ्यास
2019 साली इंजिनियरींग पूर्ण झाल्यानंतर लगेच पुढे वर्षभर प्रतिकने कोल्हापूरच्या सायबर कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी केली. पुढे पुण्यात जाऊन प्रतिकने ही तयारी सुरूच ठेवली. पुण्यात कोणताही क्लास न लावता त्याने दोन वर्ष स्वत: ग्रंथालयात जाऊन अभ्यास केला होता. त्याच्या या कष्टामुळेच आज राज्यात 46 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन तो राज्य विक्रीकर निरीक्षक बनला आहे.
advertisement
गावात सर्वांना आनंद
प्रतीक मगदूम याने पहिल्यांदा विक्रीकर निरीक्षक होण्याचा मान मिळवल्यानंतर गावात सर्वांनी त्याचे भरभरून कौतुक केले होते. ठिकठिकाणी त्याचा सत्कारही करण्यात आला होता. तर आता हाच बहुमान दुसऱ्यांदा पटकावल्यामुळे देखील परिवार आणि मित्रमंडळींसह गावकऱ्यांनीही आनंद व्यक्त केला आहे.
पतीनं दिली खंबीर साथ, अन् मुक्त विद्यापीठात शिक्षण घेतलेल्या महिलेची MPSC मध्ये क्लास 1 पदाला गवसणी!
view commentsप्रतिकला मिळालेल्या या यशात आई-वडील आणि मार्गदर्शक शिवम माथुरे यांचे बहुमोल योगदान असल्याचे तो सांगतो. दरम्यान दरवर्षी साधारणपणे दरवर्षी 3 ते 5 लाख विद्यार्थी परीक्षेस बसत असतात. यातून असे यश प्रतिकने खेचून आणल्यामुळे गावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
Location :
Kolhapur,Kolhapur,Maharashtra
First Published :
March 26, 2024 12:27 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
क्लास लावला नाही, जिद्दीनं केला अभ्यास; शेतकऱ्याचा मुलगा दुसऱ्यांदा बनला हा अधिकारी

