advertisement

NEET UG Result 2024 : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर नीट यूजीचा निकाल जाहीर, सेंटर आणि शहरानुसार पाहता येणार

Last Updated:

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एनटीएला नीटचे निकाल सेंटरनुसार आणि शहरानुसार जाहीर करण्याचे आदेश दिले होते.

News18
News18
दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार एनटीएने मेडिकल प्रवेश परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. नीट युजी २०२४ चा निकाल सेंटरनुसार आणि शहरानुसार जारी केला आहे. नीटच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एनटीएला नीटचे निकाल सेंटरनुसार आणि शहरानुसार जाहीर करण्याचे आदेश दिले होते. तसंच विद्यार्थ्यांची ओळख गुप्त ठेवण्यासही सांगितलं होतं. exams.nta.ac.in/NEET , neet.ntaonline.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की, पेपर लीक फक्त पटना आणि हजारीबाग या केंद्रापुरतेच झाले आहेत की नाहीत हे ठरवण्यासाठी निकालाच्या संपूर्ण डेटाचे विश्लेषण गरजेचे आहे. ओळख लपवण्यासाठी डमी नंबर जारी केले जाऊ शकतात असंही सुप्रीम कोर्टाच्या पीठाने म्हटलं होतं. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पारदीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या पीठाने हे आदेश दिले होते. नीट पेपर लीक आणि इतर आरोप करत परीक्षा रद्द करण्याची आणि नव्याने परीक्षा घेण्याची मागणी करण्यात आली होती. या याचिकांवर गुरुवारी सुनावणी झाली.
advertisement
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र सरकार आणि एनटीएच्या दाव्यांना निराधार असल्याचं म्हटलं होतं. नीट युजीचा पेपर ५ मे रोजी परीक्षा सुरु होण्याच्या ४५ मिनिटं आधी फुटला होता असा दावा केला गेला होता. सर्वोच्च न्यायालयाने हे काल्पनिक आणि तथ्यहिन असल्याचं म्हटलं होतं. परीक्षेच्या दिवशी पेपर लीक झाला आणि तो सोडवून मुलांना ते लक्षात ठेवण्यासाठीही दिले गेले हे शक्य नाही.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
NEET UG Result 2024 : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर नीट यूजीचा निकाल जाहीर, सेंटर आणि शहरानुसार पाहता येणार
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement