NHPC Recruitment 2024: 1,60,000 रुपये पगार मिळणारी नोकरी हवीये का? परीक्षेशिवाय होणार निवड; इथे करा अप्लाय

Last Updated:

सरकारी नोकरीची संधी मिळणं किंवा सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करताना त्यात यश येणं ही यशाची खूप मोठी पायरी असते. असंच सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

NHPC Recruitment 2024
NHPC Recruitment 2024
मुंबई : उत्तम शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्यानंतर नोकरीच्या संधीदेखील चांगल्या प्रकारच्या मिळाल्या पाहिजेत, अशी प्रत्येकाची इच्छा असते. सरकारी नोकरीची संधी मिळणं किंवा सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करताना त्यात यश येणं ही यशाची खूप मोठी पायरी असते. असंच सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
एनएचपीसी लिमिटेडमध्ये नोकरीची (सरकारी नोकरी) संधी शोधत असलेल्या युवकांसाठी ही एक चांगली बातमी आहे. यासाठी एनएचपीसीनं प्रशिक्षणार्थी अभियंता (ट्रेनी इंजिनीअर्स)/ प्रशिक्षणार्थी अधिकारी (ट्रेनी ऑफिसर्स) पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ज्या इच्छुक उमेदवारांची या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छा असेल, त्यांना nhpcindia.com या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून अर्ज करता येईल. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
advertisement
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी Good News! 8 लाख कर्मचाऱ्यांच्या सॅलरी, सुट्टीवर मोठा निर्णय
एनएचपीसी भरती 2024 च्या माध्यमातून एकूण 280 पदांवर भरती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांना या पदांसाठी येत्या 26 मार्चपर्यंत अर्ज करता येईल. या पदांवर GATE – 2023 च्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. जर या पदांसाठी तुम्ही अर्ज करण्यास इच्छुक असाल तर पुढच्या काही गोष्टी लक्षपूर्वक वाचा.
advertisement
`एनएचपीसी`मध्ये भरल्या जाणाऱ्या पदांची संख्या
एनएचपीसीमध्ये GATE – 2023 च्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी अभियंता/ प्रशिक्षणार्थी अधिकारी यांच्या एकूण 280 पदांसाठी भरती केली जाणार आहे. सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, ई अँड सी, आयटी, जिऑलॉजी, एन्व्हायर्न्मेंट अशा विविध विभागांत ही पदं भरली जाणार आहे. काही पदं आरक्षितही आहेत.
एनएचपीसीमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी आर्हता
प्रशिक्षणार्थी अभियंता (सिव्हिल) – उमेदवारांकडे इंजिनीअरिंग/तंत्रज्ञान/बीएस्सीमध्ये किमान 60% गुणांसह अधिकृत पदवी असली पाहिजे. तेव्हाच ते अर्ज करण्यास पात्र मानले जातील.
advertisement
एनएचपीसीमध्ये मिळेल या आधारावर नोकरी
उमेदवारांची या पदावर होणारी निवड ही GATE – 2023 च्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे आणि व्यवस्थापनाकडून निश्चित केल्या गेलेल्या निकषांच्या आधारे गटचर्चा आणि वैयक्तिक मुलाखत याच्या आधारावर केली जाईल. योग्य उमेदवारांना GATE – 2023 च्या परीक्षेत योग्य आणि वैध गुण मिळणं आवश्यक आहे.
NHPC Recruitment 2024 साठी अर्ज करण्यासाठी डायरेक्ट लिंक https://www.nhpcindia.com/
advertisement
NHPC Recruitment 2024 अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन पुढील लिंकवर वाचता येईल. https://www.nhpcindia.com/assests/pzi_public/pdf_link/65e70bc81895b.pdf
एनएचपीसीमध्ये निवड झाल्यानंतर मिळणार वेतन
ज्या उमेदवारांची या पदांवर निवड केली जाईल, त्यांना एक वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीदरम्यान 50,000 – 3% - 1,60,000 (आयडीए) (ई2) च्या स्केलनुसार वेतन दिलं जाणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी संपल्यानंतर उमेदवारांना एक वर्ष प्रोबेशन पीरियडसह समान वेतन श्रेणी दिली जाईल.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
NHPC Recruitment 2024: 1,60,000 रुपये पगार मिळणारी नोकरी हवीये का? परीक्षेशिवाय होणार निवड; इथे करा अप्लाय
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement