सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी Good News! 8 लाख कर्मचाऱ्यांच्या सॅलरी, सुट्टीवर मोठा निर्णय
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
भारतीय बँक संघटना आणि बँक कर्मचारी संघटनांमध्ये शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे बँक कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू फुलणार आहे.
नवी दिल्ली : देशभरातील सरकारी बँक कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट मिळालं आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे अधिकारी आणइ कर्मचाऱ्यांच्या वेतनात वार्षिक 17 टक्केंची वाढ होणार आहे. नोव्हेंबर 2022 पासून प्रभावित होणाऱ्या निर्णयाचा जवळपास आठ लाख बँक कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. भारतीय बँक संघ आणि बँक कर्मचाऱ्सांच्या संघटनांमध्ये शुक्रवारी 17 टक्क्यांची वार्षिक वेतन वाढीवर सहमती झाली. यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर वार्षिक 8,284 कोटी रुपयांचा अतिरिक्त ओझं पडेल.
आयबीए, बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनांसोबत बातचित करुन वार्षिक वेतनात संशोधन करते. या दरम्यान ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशनने म्हटलं की, शनिवारी सुट्ट्याच्या रुपात मंजुरी देण्यावरही सहमती झाली. मात्र कामकाजाच्या तासांमध्ये सुधारणेचा प्रस्तावर सरकारी अधिसूचनेनंतर प्रभावी होईल.
महिला बँक कर्मचाऱ्यांना मिळणार खास परवानगी
बँक अधिकाऱ्यांच्या संघटनेने म्हटलं की, 'नवीन वेतनश्रेणी 8088 अंकांच्या महागाई भत्ता (DA) आणि त्यावर अतिरिक्त वेटेज समाविष्ट करून निर्धारित करण्यात आली आहे.' नवीन वेतन कराराअंतर्गत सर्व महिला कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र न देता देखील दर महिन्याला एक दिवसाची सिक लिव्ह म्हणजेच आजार रजा घेता येईल. यामध्ये म्हटलं आहे की, संचित विशेषाधिकार सुट्टी (पीएल) सेवानिवृत्तीच्या वेळी किंवा सेवेदरम्यान कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यावर 255 दिवसांपर्यंत कॅश केले जाऊ शकते.
advertisement
बँकांची संघटना आयबीएचे मुख्य कार्यपालक अधिकारी सुनिल मेहता यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर एका संदेशात म्हटलं की, 'आज बँक उद्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आयबीए आणि यूएफबीयू, एआयबीओयू, एआयबीएएसएम आणि बीकेएसएमने बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी वेतन संशोधनाच्या संबंधात नवव्या संयुक्त नोट आणि 12 व्या द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी केली आहे. हे एक नोव्हेंबर 2022 पासून प्रभावी होईल.'
advertisement
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांद्वारे भरलेल्या पेन्शन/कौटुंबिक निवृत्ती वेतनाव्यतिरिक्त मासिक अनुग्रह रक्कम दिली जाईल यावर सहमती झालेली आहे. ही रक्कम त्या पेन्शनधारकांना आणि कुटुंबियांना मिळेल जे 31 ऑक्टोबर 2022 किंवा त्यापूर्वी पेन्शन मिळवण्यासाठी पात्र असतील. त्या तारखेला सेवानिवृत्त होणारे लोकही या कक्षेत येतील.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 09, 2024 11:08 AM IST
मराठी बातम्या/मनी/
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी Good News! 8 लाख कर्मचाऱ्यांच्या सॅलरी, सुट्टीवर मोठा निर्णय


