बँक ते शेअर बाजार तीन दिवस बंद राहणार, ATM मध्येही खडखडाट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
याशिवाय शेअर मार्केट, स्टॉक मार्केटही आज बंद राहणार आहे.
मुंबई : तुमची बँकेची काम करायची असतील किंवा काही कामं ही चेक बाबत असतील पैसे काढायचे किंवा भरायचे असतील तर आज अनेक कामं अडकण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे लाँग विकेण्ड आल्याने सलग तीन दिवस सुट्टी आहे. त्यामुळे आजपासून तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. याशिवाय शेअर मार्केट, स्टॉक मार्केटही आज बंद राहणार आहे.
शिवरात्रीनिमित्त आज म्हणजेच 8 मार्च रोजी देशभरातील बँका आणि शेअर मार्केटला आज सुट्टी आहे. सुट्टीमुळे NSE-BSE वरील ट्रेडिंग 3 दिवस बंद राहणार आहे. महाशिवरात्रीमुळे सुट्टी आहेच पण 9 मार्चला दुसरा शनिवार आणि 10 मार्चला रविवार आहे. सोमवारी 3 दिवसांनी बँक आणि शेअर मार्केट सुरू होणार आहे.
याशिवाय मार्च महिन्यातील सणांमुळे शनिवार आणि रविवार व्यतिरिक्त आणखी ६ दिवस बँका बंद राहणार आहेत. मार्च महिन्यात बँका कधी बंद राहणार आहेत ते आम्हाला कळवा. रिझर्व्ह बँकेच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, चंदीगड, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, जम्मू काश्मीर, केरळ, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, या राज्यांमध्ये महाशिवरात्रीचा सण साजरा केला जाऊ शकतो. झारखंड आणि हिमाचल प्रदेश येथे बँकांना सुट्ट्या असणार आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 08, 2024 11:02 AM IST


