डी फार्मसी शिक्षणातून स्वत:चा व्यवसाय आणि सरकारी नोकऱ्यांसाठी उत्तम पर्याय

Last Updated:

डी फार्मसीचे शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना झटपट नोकरी मिळते विद्यार्थी स्वतःच मेडिकल दुकान चालू करू शकतात. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून नोकरी करता येते

+
D

D pharmacy 

उदय साबळे-प्रतिनिधी, उस्मानाबद :
औषध निर्माण शास्त्र, म्हणजेच फार्मसीच्या क्षेत्रात D फार्मसीचे शिक्षण घेतल्यानंतर करिअरच्या अनेक सुवर्णसंधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. भारतातील वैद्यकीय क्षेत्र झपाट्याने विस्तारत असून, यातून विद्यार्थ्यांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नोकरीच्या मोठ्या संधी मिळत आहेत. D फार्मसी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये झटपट नोकरी मिळवता येते.
विद्यार्थी स्वतःच मेडिकल दुकान चालवू शकतात, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करू शकतात किंवा हॉस्पिटलमध्ये फार्मासिस्ट म्हणूनही नोकरी मिळवू शकतात. तसेच फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये केमिस्ट म्हणून काम करण्याची संधीही मिळते. सरकारी रुग्णालये, सामुदायिक आरोग्य केंद्रे, आणि इतर सरकारी औषध व्यवसायांमध्ये विविध पदांसाठी D फार्मसी उपयुक्त ठरते.
advertisement
D फार्मसीनंतर, विद्यार्थ्यांना डेटा विश्लेषक, असिस्टंट प्रोफेसर, क्लिनिकल फार्मासिस्ट, फार्माकोलॉजिस्ट अशा विविध पदांवर काम करता येते. औषध उद्योगात सातत्याने तांत्रिक प्रगती होत असल्याने फार्मसी क्षेत्रातील नोकरी संधींमध्ये वाढ होत आहे. याशिवाय, सरकारी अर्थसंकल्पातून फार्मास्युटिकल क्षेत्रासाठी वाढती गुंतवणूक होत असल्याने सरकारकडून नोकरीच्या संधींना प्रोत्साहन मिळते आहे.
advertisement
विद्यार्थ्यांना VMC, DHMO, VVCMC यांसारख्या सरकारी संस्थांमध्ये नोकरी मिळण्याची संधी आहे. हे सर्व D फार्मसीसह विविध पदांसाठी रिक्त जागा वर्षभर प्रसिद्ध करतात. त्यामुळे D फार्मसी पूर्ण केल्यानंतर वैद्यकीय आणि औषध क्षेत्रात झटपट करिअरची संधी उपलब्ध होते.
मराठी बातम्या/करिअर/
डी फार्मसी शिक्षणातून स्वत:चा व्यवसाय आणि सरकारी नोकऱ्यांसाठी उत्तम पर्याय
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement