Police Bharati 2025: खाकी वर्दीचं स्वप्न साकार होणार! लोहमार्ग पोलीस दलात भरती, लगेच करा अर्ज
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Police Bharati 2025: सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. लोहमार्ग पोलीस दलात भरती सुरू झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर : पोलीस दलात करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. लोहमार्ग पोलिस विभागात 2024 – 2025 या वर्षासाठी पोलिस शिपाई पदांची भरती जाहीर झाली आहे. या भरतीत एकूण 93 रिक्त पदांवर नियुक्ती होणार असून अर्ज प्रक्रिया 29 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे.
अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ policerecruitment2025.mahait.org किंवा www.mahapolice.gov.in या संकेतस्थळांवर जाऊन आवश्यक माहिती भरावी. भरतीसंदर्भातील सर्व तपशील, पात्रता निकष, शारीरिक चाचणी आणि परीक्षेची माहिती या संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्ज फक्त ऑनलाइन माध्यमातूनच स्वीकारले जाणार असून प्रत्यक्ष कार्यालयात अर्ज सादर करता येणार नाही. इच्छुक उमेदवारांनी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून वेळेत अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
लोहमार्ग पोलिस दलात सेवेसाठी ही एक उत्तम संधी असून, या भरतीमुळे रेल्वे परिसरातील सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे. तरुणांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेत पोलिस दलाचा भाग होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
October 29, 2025 10:52 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
Police Bharati 2025: खाकी वर्दीचं स्वप्न साकार होणार! लोहमार्ग पोलीस दलात भरती, लगेच करा अर्ज


