आजोबा अन् वडिलांची मिळाली साथ; मेघनानं करुनच दाखवलं, पाहा कशी बनली पुण्यातील पहिली महिला फायरमन
- Published by:News18 Marathi
Last Updated:
तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून करायची असेल आणि त्यासाठीची जिद्द तुमच्या अंगी असेल तर त्या गोष्टीपासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. आजोबा आणि वडिलांच्या साथीने मेघना वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी महिला फायर फायटर झाली आहे.
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे : तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून करायची असेल आणि त्यासाठीची जिद्द तुमच्या अंगी असेल तर त्या गोष्टीपासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. पुण्यातील मेघना सपकाळ हिने हे सिद्ध करुन दाखवले आहे. त्यात आजोबा आणि वडिलांच्या साथीने मेघना वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी महिला फायर फायटर झाली आहे.
कसं मिळवलं यश?
मेघना महेंद्र सपकाळ हिने पुण्यातील गरवारे कॉलेजमधून कॉमर्समध्ये पदवी मिळवली आहे. त्यानंतर तिने अग्निशमन अभ्यासक्रम देखील पूर्ण केला. मागील काही दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेकडून अग्निशमन दलात 167 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर मेघनाने या भरतीसाठी अर्ज केला होता. तिने परीक्षा आणि पात्रतेचे निकष देखील पूर्ण केले.
advertisement
इच्छा नसताना कोरोनाकाळात सोडलं पुणे, पण अमरावतीमध्ये वाजवला डंका, मैथिलीनं विद्यापीठात मिळवले 2 gold medal
पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलातील जवान भरती प्रक्रियेत 167 उमेदवारांची निवड झाली आहे. पुणे अग्निशमन दलात प्रथमच महिला फायरमनपदी मेघना महेंद्र सपकाळ यांची निवड झाली आहे. पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात सध्या 250 जवान आहेत. शहराचा वाढता विस्तार पाहता अग्निशमन दलातील मनुष्यबळ अपुरे होते. महापालिकेने 167 जवानांची भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला होता.
advertisement
सातवीत शिकणाऱ्या मुलाची कमाल; एकाच वेळी मिळवल्या एकूण 7 शिष्यवृत्ती
view commentsशहराच्या इतिहासात तब्बल 136 वर्षांनंतर मनपा अग्निशमन दलात "फायरमन' म्हणून महिला कर्मचाऱ्याची निवड झाली आहे. तर, मनपा स्थापनेच्या 74 व्या वर्षी पहिल्यांदाच महिलेस या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. म्हणजे, मेघनाचे आजोबा सदाशिव बापूराव सपकाळ हे अग्निशमन दलात कार्यरत होते. ते सेवानिवृत्त झाले आहेत तर मेघनाचे वडील महेंद्र सपकाळ हे देखील अग्निशमन दलात कार्यरत आहेत. कुटुंबातील ही अग्निशमन दलातील सेवेची परंपरा मेघनाने ही आता जपली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
March 01, 2024 2:13 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
आजोबा अन् वडिलांची मिळाली साथ; मेघनानं करुनच दाखवलं, पाहा कशी बनली पुण्यातील पहिली महिला फायरमन

