सातवीत शिकणाऱ्या मुलाची कमाल; एकाच वेळी मिळवल्या एकूण 7 शिष्यवृत्ती
- Published by:News18 Marathi
Last Updated:
कोल्हापुरातील एका विद्यार्थ्याने चक्क एकाच वेळी सात शिष्यवृत्ती मिळविल्या आहेत. या सर्वच्या सर्व शिष्यवृत्ती युएसए युनिव्हर्सिटीकडून आकाशला मिळालेल्या आहेत.
साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी
कोल्हापूर : वेगवेगळ्या टॅलेंट सर्च परीक्षा मधून लहान मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिल्या जात असतात. यासाठी विद्यार्थी देखील तितकेच प्रयत्न करत असतात. मात्र कोल्हापुरातील एका विद्यार्थ्याने चक्क एकाच वेळी सात शिष्यवृत्ती मिळविल्या आहेत. या सर्वच्या सर्व शिष्यवृत्ती युएसए युनिव्हर्सिटीकडून आकाशला मिळालेल्या आहेत.
कोल्हापुरातील आकाश चेलानी हा विग्योयर हायस्कूलमध्ये सातवीत शिकणारा फक्त 13 वर्षांचा मुलगा आहे. लक्ष्मीपुरी परिसरात आकाश आपल्या आईसोबत राहतो. त्याची आई रिंपल चेलानी या एका खाजगी कंपनीत काम करतात. आकाशने नोव्हेंबरमध्ये भारतात घेतल्या गेलेल्या Ei Asset Talent Search या परीक्षेत गोल्ड स्कॉलर सर्टिफिकेट मिळविले आहे. तसेच त्यातून विविध सात आतंरराष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळवण्यात देखील त्याने यश मिळवले आहे. त्यामुळे आकाशच्या शिक्षक आणि मित्र परिवाराकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
advertisement
अजून आंतरराष्ट्रीय परीक्षांसाठी तयारी
आकाशला अगदी लहान पणापासूनच अभ्यासाची आवड होती. हळूहळू ती आवड वाढल्यामुळेच आकाशने आंतरराष्ट्रीय स्तरावर मजल मारली आहे. इतक्या लहान वयात इतकी मोठी कामगिरी करत असल्यामुळे आकाशचा गर्वच वाटतो. आकाश हा पुढे अजूनही अशा प्रकारच्या परीक्षा देण्यासाठी तयारी करत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय फिजिक्स ऑलिंपियाड, आंतरराष्ट्रीय केमिस्ट्री ऑलिंपियाड आदी परीक्षा देण्यासाठी आकाश सराव करत आहे, असे आकाशच्या आई रिंपल चेलानी यांनी सांगितले आहे.
advertisement
कोणत्या शिष्यवृती केल्या संपादित?
आपली चमक दाखवत आकाशने युएसए विद्यापीठाच्या पुढील सात शिष्यवृत्ती संपादित केल्या आहेत.
1 . नॉर्थवेस्टर्न सेंटर फॉर टॅलेंट डेव्हलपमेंट
2. नॉर्थवेस्टर्न सेंटर फॉर टॅलेंट डेव्हलपमेंट- समर रेसिडेंट प्रोग्राम फ्रॉम यूएसए युनिव्हर्सिटी
3. Purdue युनिव्हर्सिटीस् गेरी स्टार प्रोग्राम फ्रॉर्म यूएसए युनिव्हर्सिटी
4. समर इन्स्टिट्यूट फॉर गिफ्टेड प्रोग्रॅम्स फ्रॉम यूएसए युनिव्हर्सिटी
advertisement
5. नॉर्थवेस्टर्न सेंटर फॉर टॅलेंट डेव्हलपमेंट सिव्हिल लीडरशिप इन्स्टिट्यूट फ्रॉम यूएसए युनिव्हर्सिटी
6. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया (Berekley) अकॅडमी टॅलेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम (ATDP) फॉर यूएसए युनिव्हर्सिटी
7. गिफ्टेड समर प्रोग्राम बाय Genwise फ्रॉम मणिपाल युनिव्हर्सिटी.
या डान्सचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश, तरुणीनं जिंकली सर्वांची मनं, नेमकं काय केलं?
दरम्यान अशा प्रकारच्या अनेक शिष्यवृत्ती स्पर्धा आणि परीक्षा मुलांसाठी घेण्यात येत असतात. विविध शाळांच्या मार्फत देखील त्याबाबत मार्गदर्शन दिले जाते. याबद्दल जर कुणाला मार्गदर्शन हवे असेल तर केव्हाही माझ्याशी संपर्क करु शकता. मात्र नक्कीच आपल्या मुलांना अशा शिष्यवृत्ती परीक्षांसाठी प्रोत्साहित करा, असेही रिंपलचेलानी यांनी सांगितले आहे.
advertisement
माहितीसाठी संपर्क (रिंपल चेलानी) : +91 98235 75976
Location :
Kolhapur,Kolhapur,Maharashtra
First Published :
February 27, 2024 3:49 PM IST