advertisement

छ. संभाजीनगर पालिकेत 222 पदांसाठी जम्बो भरती, कसा आणि कुठे करायचा अर्ज?

Last Updated:

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने गट-क संवर्गातील विविध विभागांतील एकूण 222 रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

News18
News18
‎‎छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने गट-क संवर्गातील विविध विभागांतील एकूण 222 रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. अभियांत्रिकी, अग्निशमन, सार्वजनिक आरोग्य, सुरक्षा, तांत्रिक तसेच लेखा विभागातील पदांचा यात समावेश आहे. सरळसेवेने ही पदे भरण्यात येणार असून अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेत सर्वाधिक 100 पदे अग्निशामकांची असून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 32, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 24, चालक-यंत्रचालक 15, स्वच्छता निरीक्षक 12, रोखपाल 12 यांसह इतर पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ‎www.chhsambhajinagarmc.org येथे जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत.
‎अर्ज करण्याचा कालावधी 17 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 असा असून परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. ‎या भरती प्रक्रियेत सर्वाधिक 100 पदे अग्निशामकांची आहेत. तसेच कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, चालक-यंत्रचालक, स्वच्छता निरीक्षक, रोखपाल यांसह इतर विविध पदांचा समावेश आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी निश्चित मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. प्रवेशपत्र परीक्षेच्या सात दिवस आधी उपलब्ध होणार आहे.
advertisement
‎‎भरतीतील पदांचा क्रमवार तपशील (गट-क)
‎‎1) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 32 पदे
‎2) उपअग्निशमन केंद्र अधिकारी – 4 पदे
‎3) सहाय्यक सुरक्षा अधिकारी – 1 पद
‎4) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक / अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक – 24 पदे
‎5) स्वच्छता निरीक्षक – 12 पदे
‎6) पशुधन पर्यवेक्षक – 7 पदे
advertisement
‎7) चालक-यंत्रचालक (Driver Operator) – 15 पदे
‎8) उद्यान सहाय्यक / कृषी सहाय्यक – 6 पदे
‎9) अनुरेखक (Tracer) – 9 पदे
‎10) अग्निशामक – 100 पदे
‎11) रोखपाल – 12 पदे
‎सदर सर्व पदांसाठी वेतनश्रेणी 7व्या वेतन आयोगानुसार एस-6 ते एस-14 स्तरांमध्ये निश्चित करण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
छ. संभाजीनगर पालिकेत 222 पदांसाठी जम्बो भरती, कसा आणि कुठे करायचा अर्ज?
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement