Success Story : TCS, विप्रोसह 13 कंपन्याच्या नोकऱ्या नाकारल्या, आता मिळवलं 20 लाखांचं पॅकेज, कोण आहे ही तरुणी?
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
जॉब ऑफर खूप चांगल्या होत्या. तिच्या कुटुंबालाही तिच्या सर्व जॉब ऑफर आवडल्या होत्या. पण, रितीनं आपल्या अंत:प्रेरणेवर विश्वास ठेवून वॉलमार्टमध्ये इंटर्नशिप करण्याचा निर्णय घेतला.
मुंबई, 16 ऑगस्ट : वाढती लोकसंख्या आणि प्रचंड स्पर्धा यामुळे आजकाल नोकरी मिळणं फार कठीण झालं आहे. अशातच एखादी चांगल्या पगाराची नोकरी मिळत असेल तर कोणीही ती सोडणार नाही. मात्र, एका तरुणीनं इंटर्नशीपसाठी अनेक दिग्गज कंपन्यांची ऑफर नाकारण्याचं धाडस दाखवलं आहे. रिती कुमारी असं या 21 वर्षांच्या तरुणीचं नाव आहे. तिनं टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रोसह 13 कंपन्यांच्या ऑफर नाकारल्या आहेत. या पैकी एका कंपनीनं तिला 17 लाख रुपये वार्षिक वेतन देऊ केलं होतं. रितीनं या सर्व जॉब ऑफर नाकारून वॉलमार्टमध्ये इंटर्नशिप पूर्ण केली.
या जॉब ऑफर नाकरून एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. आता रिती वर्षाला 20 लाख रुपयांहून अधिक कमवते. मनीकंट्रोलनं दिलेल्या बातमीनुसार, बंगळुरूतील सॉफ्टवेअर इंजिनीअर रितीनं सांगितलं की, सर्व जॉब ऑफर खूप चांगल्या होत्या. तिच्या कुटुंबालाही तिच्या सर्व जॉब ऑफर आवडल्या होत्या. पण, रितीनं आपल्या अंत:प्रेरणेवर विश्वास ठेवून वॉलमार्टमध्ये इंटर्नशिप करण्याचा निर्णय घेतला. ही इंटर्नशिप सहा महिन्यांची होती. यादरम्यान तिला 85 हजार रुपये मिळाले, 'एबीपी'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
advertisement
ती म्हणाली की, त्या वेळी तंत्रज्ञान क्षेत्रात कठीण काळ सुरू होता. लॉकडाउन दरम्यान इंटर्नशिपचा निर्णय खूप धोकादायक होता. पण, तिच्या बहिणीनं तिला आपल्या इच्छेनुसार निर्णय घेण्याचा सल्ला दिला. हा सल्ला ऐकून रितीनं वॉलमार्ट इंटर्नशिप पूर्ण केली. वॉलमार्टकडून इंटर्नशिप ऑफर मिळाल्याचा तिला आनंद झाला होता.
advertisement
रिती कुमारी पुढे म्हणाली, "त्यावेळी कोणीच तिच्या निर्णयाशी सहमत नव्हतं आणि सगळ्यांनी तिला चुकीचं ठरवलं. पण, तिनं तिच्या अंत:प्रेरणेवर विश्वास ठेवला आणि वॉलमार्टमध्ये इंटर्नशिपची ऑफर स्वीकारली. तिनं खूप मेहनत घेतली, प्री-प्लेसमेंट ऑफर इंटरव्ह्यु दिला. यानंतर तिला नोकरी मिळाली. रिती कुमारी सध्या वॉलमार्टमध्ये काम करत असून तिला वार्षिक 20 लाख रुपये पगार मिळतो.
advertisement
शाळा आणि महाविद्यालयाच्या इतिहासातील अव्वल रँकर्सपैकी एक असल्याचा तिला अभिमान आहे. रितीच्या यशामुळे तिचे आई-वडील खूप आनंदी आहेत. तिच्या वडिलांना तर तिचा खूप अभिमान वाटत आहे. प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी असेल तर एक नाहीतर अनेक संधी निर्माण करता येतात, हे रिती कुमारीनं दाखवून दिलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 16, 2023 8:44 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
Success Story : TCS, विप्रोसह 13 कंपन्याच्या नोकऱ्या नाकारल्या, आता मिळवलं 20 लाखांचं पॅकेज, कोण आहे ही तरुणी?