SSC Result: आता थांबायचं नाय! सिनेमाची रिअल स्टोरी, कचरा वेचक प्रियांकाने अखेर दहावी पास करून दाखवली!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
जीवनातील अनेक अडचणींवर मात करत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या प्रियांका कांबळे यांनी वयाच्या 26 व्या वर्षी दहावीची परीक्षा यशस्वीरीत्या पास करत 47.60 टक्के गुण मिळवले आहेत. त्यांच्या या यशाची सर्वत्र कौतुक होत आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. जीवनातील अनेक अडचणींवर मात करत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या प्रियांका कांबळे यांनी वयाच्या 26 व्या वर्षी दहावीची परीक्षा यशस्वीरीत्या पास करत 47.60 टक्के गुण मिळवले आहेत. त्यांच्या या यशाची सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रियांका कांबळे महापालिकेच्या स्वच्छता गाडीत काम करतात. त्यारोज सकाळी सात वाजता कामावर जातात आणि घरोघरी कचरा संकलनाचे काम करतात. त्याचबरोबर घरातील जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी शिक्षणात सातत्य ठेवले. मी कामावर जाऊनच दहावीच्या परीक्षेला जात होते. कामाला सुट्टी न घेता सर्व पेपर दिले, असे प्रियांका सांगतात.
advertisement
त्यांनी 8 वी ते 10 वीपर्यंत रमाबाई रानडे हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. शिक्षणाची आवड लहानपणापासून असल्यामुळे, घरकाम करणाऱ्या काकांनी त्यांना या शाळेत प्रवेश घेऊन दिला. शिक्षक, आई, आणि ज्या बाबांनी मला शाळेत प्रवेश मिळवून दिला, त्यांच्या मदतीमुळेच हे शक्य झाले, असेही त्या नमूद करतात.
परीक्षेच्या काळात घरच्यांनी त्यांना मोठा आधार दिला. घरकाम, नोकरी आणि अभ्यास यांचा समतोल राखत त्यांनी शिक्षणाची वाटचाल अखंड सुरु ठेवली. आता त्या अंगणवाडी सेविका होण्याची इच्छा बाळगतात आणि पुढील शिक्षण सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
advertisement
प्रियांकाचे हे यश केवळ वैयक्तिक नाही, तर समाजासाठी प्रेरणादायी आहे. जिद्द, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे कोणतीही अडचण पार करता येते, हे त्यांनी आपल्या उदाहरणातून दाखवून दिले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
May 15, 2025 12:46 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
SSC Result: आता थांबायचं नाय! सिनेमाची रिअल स्टोरी, कचरा वेचक प्रियांकाने अखेर दहावी पास करून दाखवली!