जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी झाले मोडी लिपी वाचनात पारंगत; शिक्षकाच्या ‘या’ निर्याणाचे तुम्ही कराल कौतुक
- Published by:News18 Marathi
Last Updated:
सातारा जिल्हातील या शाळेतील इयत्ता दुसरी आणि चौथीचे 35 विद्यार्थी मोडी वाचन आणि लेखनात पारंगत झाले आहेत.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात विजयनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बालाजी जाधव आणि उपशिक्षक यांच्या कल्पनेतून आणि प्रयत्नातून इयत्ता दुसरी आणि चौथीचे 35 विद्यार्थी मोडी वाचन आणि लेखनात पारंगत झाले आहेत. साधारण 12 व्या शतकातील ही लिपी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्र व्यवहारामुळे 16 व्या शतकापासून सर्वांना अधिक परिचित झाली. खरे तर 1960 पूर्वी ही मोडी लिपी महाराष्ट्रात शालेय शिक्षणात शिकवली जायची. मात्र छपाईच्या समस्यामुळे ती बंद करण्यात आली होती.
advertisement
विजयनगर येथील परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक बालाजी जाधव यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात इतिहासातील संशोधक होता यावे. त्याचे वाचन करता यावे या हेतूने हे लिपी शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांच्या उज्वल भविष्यासाठीचे मार्ग सुखकारक व्हावे आणि मुलांना मोडी लिपी शिकवता यावे यासाठी बालाजी जाधव यांनी तंत्रज्ञानाच्या साह्याने ही लिपी पहिली शिकून घेतली आणि त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवली आहे.
advertisement
इंग्रजी बोलताना बोबडी वळते? 'या' चप्पल शिवणाऱ्या व्यक्तीची English एकदा ऐकाच
सध्या दुसरी ते चौथीचे 35 विद्यार्थी अक्षरे, शब्द, वाक्य, वाचन करतात आणि त्याचे लेखन ही करतात. जी भाषा बोलली जाते तीच भाषा लिहिली जाते. अशा पद्धतीने मुलांना पहिल्या टप्प्यात त्यांनी मोडी लिपीची मुळाक्षरे शिकवण्यास सुरुवात केली आहे. इतिहासकालीन दस्तऐवज वाचन करताना थोडेफार अडचणी येतात मात्र दुसरी आणि चौथीचे मुले ही मोडी लिपीची भाषा मोठ्या उत्साहात आणि आनंदाने शिकत आहेत.
advertisement
विद्यार्थीच करतायेत स्ट्रॉबेरीची शेती, 'या' कृषी महाविद्यालयाला मिळालं लाखोंचं उत्पन्न
view commentsमुलांचे पालक देखील मुले ही भाषा शिकत असल्याने कौतुक करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोडी लिपी प्रचारात आणली. मात्र त्यानंतर ऐतिहासिक मोडी लिपी लोप पावण्याच्या मार्गावर होती. आता मात्र सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात असलेल्या विजयनगर इथल्या जिल्हा परिषदेच्या दुसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांनी मोडी लिपी शिकली आहे.
Location :
Satara,Satara,Maharashtra
First Published :
March 15, 2024 11:39 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी झाले मोडी लिपी वाचनात पारंगत; शिक्षकाच्या ‘या’ निर्याणाचे तुम्ही कराल कौतुक

