इंग्रजी बोलताना बोबडी वळते? 'या' चप्पल शिवणाऱ्या व्यक्तीची English एकदा ऐकाच

Last Updated:

ते जेव्हा ग्राहकांशी इंग्रजीतून बोलतात तेव्हा ग्राहकही आश्चर्यचकीत होतात. एक चप्पल शिवणारा माणूस एकेकाळी शिक्षक होता यावर त्यांचा विश्वासच बसत नाही.

+
ते

ते दररोज इंग्रजी भाषेचा सराव करतात.

अपूर्वा तळणीकर
छत्रपती संभाजीनगर : इंग्रजी बोलताना भल्याभल्यांची बोबडी वळते पण एक चप्पल शिवणारी व्यक्ती फाडफाड इंग्रजी बोलून भल्याभल्यांना गार करते. मानात इच्छाशक्ती असेल तर काहीच अशक्य नाही, असं म्हणतात तेच खरंंय. ही असामान्य गोष्ट आहे सर्वसामान्य व्यक्तीची. छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रकाश परदेशी यांची.
65 वर्षीय प्रकाश परदेशी हे चप्पल शिवण्याचा व्यवसाय करतात. गेली अनेक वर्ष ते हा व्यवसाय करत आहेत. प्रकाश परदेशी हे शहरातील भावसिंगपुरा भागात राहतात. जुबली पार्क परिसरात चप्पल, बूट शिवण्याचं काम करतात. ते सांगतात की, इयत्ता सातवीत असताना घरची सगळी जबाबदारी त्यांच्यावर पडली. आई-वडील वृद्ध झाल्याने मोठा मुलगा म्हणून त्यांनी ही जबाबदारी स्विकारली.
advertisement
शिक्षण मध्येच थांबवून त्यांना मिळेल ते काम करावं लागलं. एका मेडिकल स्टोअरमध्ये काम करत असताना त्यांच्या मनात इंग्रजी भाषेविषयी आकर्षण निर्माण झालं. त्यांनी पुढे शिकायचं ठरवलं. दहावीची परीक्षा दिली आणि त्यात त्यांना चांगले गुण मिळाले. पुढे त्यांनी पुणे विद्यापिठातून पदवी मिळवली. त्यानंतर एका शाळेत क्लर्क म्हणून नोकरी मिळाली. पुढे बढती मिळून ते तिथे इंग्रजी विषयाचे शिक्षक झाले. काही वर्ष त्यांनी शाळेत विद्यार्थ्यांना शिकवलं.
advertisement
निवृत्तीनंतर प्रकाश आपल्या पत्नीसह छत्रपती संभाजीनगर शहरात आले. इथं काहीतरी काम करावं म्हणून त्यांनी चप्पल शिवण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यांचे आई-वडीलसुद्धा हेच काम करायचे असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे 'मला हे काम करताना अजिबात लाज वाटत नाही', असं ते अभिमानाने सांगतात. तसंच ते जेव्हा ग्राहकांशी इंग्रजीतून बोलतात तेव्हा ग्राहकही आश्चर्यचकीत होतात. एक चप्पल शिवणारा माणूस एकेकाळी शिक्षक होता यावर त्यांचा विश्वासच बसत नाही.
advertisement
दरम्यान, प्रकाश हे नियमितपणे इंग्रजी वर्तमानपत्र वाचतात. आजही ते दररोज इंग्रजी भाषेचा सराव करतात. इंग्रजी शिकणं फार सोपं आहे. तुम्ही एकदा इंग्रजी शिकलात की तुम्हाला या भाषेविषयी कुठलीही अडचण येणार नाही, शिवाय चांगली वागणूकही मिळते, असं ते सांगतात.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
इंग्रजी बोलताना बोबडी वळते? 'या' चप्पल शिवणाऱ्या व्यक्तीची English एकदा ऐकाच
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement