सिंधुदुर्गतील शिक्षकाचा नादखुळा, झेडपीच्या शाळेत विद्यार्थ्यांना देतोय जर्मन भाषेचे धडे
- Published by:Mohan Najan
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
जिल्हा परिषदेतील काही शिक्षक विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. असाच एक प्रयोग सावंतवाडी इथल्या चौकूळच्या वाडीतील शाळेत पाहायला मिळाला.
निरंजन कामत, प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : मोठ मोठे डोनेशन अन् भरभक्कम शैक्षणिक फीस देऊन अनेक पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतात. यामुळेच मराठी शाळांमध्ये प्रवेश घेण्याच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होताना दिसत आहे. यावरच पर्याय म्हणून या शाळा टिकाव्यात म्हणून जिल्हा परिषदेतील काही शिक्षक विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. असाच एक प्रयोग सावंतवाडी इथल्या चौकूळच्या वाडीतील शाळेत पाहायला मिळाला. या अतिदुर्गम भागात शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षक जावेद तांबोळी यांच्याकडून चक्क जर्मन भाषेचे धडे दिले जात आहेत.
advertisement
सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणाऱ्या सावंतवाडी तालुक्यामधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकुळ नंबर 4 ही मराठी वाडीतील शाळा आहे. वाडीत जेमतेम 20 ते 30 घर आहेत. त्यामुळे शाळेत विद्यार्थीही बोटावर मोजण्याइतकेच आहेत. त्यामुळे शाळा तशी दुर्गमच. इथं शाळेत नेटवर्क सुद्धा येत नाही मात्र विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास हीच शिक्षणाची व्याख्या आहे या अनुषंगाने या शाळेत हजर झालेले शिक्षक जावेद तांबोळी हे विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी लागावी यासाठी त्यांनी फक्त पुस्तकी ज्ञान न घेता विविध कौशल्य आत्मसात करावेत. या हेतून आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत वेगवेगळी उपक्रम घेतात.
advertisement
यावेळी त्यांनी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना चक्क जर्मन भाषेची ओळख करून दिली. जर्मन भाषेची बेसिक ओळख 1 ते 10 अंक आणि अल्फाबेट्स जर्मनीतून त्यांनी शिकवले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी हे लगेचच आत्मसातही केलं. विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभाषेबरोबरच इंग्रजी जशी महत्त्वाची आहे तशी जर्मन भाषा सुद्धा महत्त्वाची असल्याच शिक्षक जावेद तांबोळी यांनी सांगितलं.
advertisement
एकीकडे इंग्रजी माध्यमांमधील विद्यार्थ्यांना अभ्यासाचं ओझं त्यानंतर होमवर्क ट्युशनचा अभ्यास असल्यानं तणाव निर्माण होतो. अशामुळे मुलांमधील नैसर्गिक गुण हरवले जातात. तर दुसरीकडे शासकीय शाळा त्याही ग्रामीण भागात असतील तर तिथल्या शिक्षणाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र याही परिस्थितीत जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक कल्पकता दाखवून शैक्षणिक दर्जा वाढवण्याबरोबरच मुलांसाठी शाळेतील वातावरण आनंददायी बनवतात. आणि या वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे सर्वांगीण शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जातं हे पुन्हा एकदा सिद्ध केलंय.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
December 13, 2024 6:20 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
सिंधुदुर्गतील शिक्षकाचा नादखुळा, झेडपीच्या शाळेत विद्यार्थ्यांना देतोय जर्मन भाषेचे धडे