Study Abroad: यूएसएमध्ये जाऊन शिक्षण घेण्याचं स्वप्न आहे का? मग तयार ठेवा हे डॉक्यूमेंट्स
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Study Abroad:दरवर्षी हजारो भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जातात. अशा वेळी, आगामी सत्रांमध्ये अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत.
Study Abroad in USA: ग्लोबल होत असलेल्या जगात विद्यार्थी आता उच्च शिक्षणासाठी देश नाही तर विदेशातही शिक्षणाच्या संधी शोधत आहेत. त्यामध्ये यूके, यूएसए आणि इतर यूरोपीय देश विद्यार्थ्यांची पहिली पसंत असतात. यूएसमध्ये दरवर्षी हजारोंच्या संख्येत भारतीय विद्यार्थी हे शिक्षणासाठी जातात. अशा वेळी परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आज आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत.
प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी यूएसएला जाण्यापूर्वी अनेक महत्त्वाची कागदपत्रे तयार ठेवावीत, जेणेकरून त्यांना नंतर अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. महत्त्वाच्या कागदपत्रांची लिस्ट येथे पाहूया-
पासपोर्ट – देशाबाहेर जाण्यासाठी सर्वात महत्त्वाचा कागदपत्र म्हणजे पासपोर्ट. त्याशिवाय तुम्हाला बाहेरचा प्रवास करता येणार नाही. त्यामुळे वेळेत अर्ज करा आणि तुमचा पासपोर्ट बनवा.
advertisement
फ्लाइटचे कागदपत्र - आपल्या प्लेनशी संबंधित सर्व डॉक्यूमेंट्स आणि त्याची कॉपी सांभाळून ठेवा. हे हरवल्यावर तुम्हाला एअरपोर्टवर अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
व्हिजा - पासपोर्ट ऐवजी व्हिजा देखील कोणत्याही देशाच्या प्रवासासाठी महत्त्वाचा डॉक्यूमेंट आहे. यामुळे त्यासाठीही योग्य वेळीच अप्लाय करा. व्हिजा मिलाल्यानंतर तो पासपोर्टसह सांभाळून ठेवा.
अॅडमिशन लेटर - यूनिव्हर्सिटी किंवा कॉलेजमधून अॅडमिशनचं लेटर प्राप्त झाल्यानंतर ते सांभाळून टेवा आणि आठवणीने सोबत घेऊन जा.
advertisement
फॉर्म I-20 - USA मध्ये अभ्यास करण्यासाठी फॉर्म I-20 देखील आवश्यक आहे. म्हणून, फॉर्मची ओरिजिनल आणि साइन केलेली कॉपी आपल्याकडे ठेवा. USA मध्ये प्रवेश घेताना हे कस्टम ऑफिसरला दाखवणे आवश्यक आहे.
या व्यतिरिक्त मेडिकल रेकॉर्ड्स, हेल्थ इन्शुरन्स डॉक्यूमेंट्स आणि शैक्षणिक डॉक्यूमेंट्स देखील आपल्यासोबत ठेवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 15, 2023 9:05 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
Study Abroad: यूएसएमध्ये जाऊन शिक्षण घेण्याचं स्वप्न आहे का? मग तयार ठेवा हे डॉक्यूमेंट्स










