Success story : 1 कोटीची नोकरी सोडून सुरु केला स्टार्टअप, UP मधील 'या' तरुणीची जगभर चर्चा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आज तिच्या कंपनीचा महसूल 40 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आता ती एक यशस्वी उद्योजिका बनली आहे.
मुंबई : आजकाल नोकरी सोडून व्यवसाय सुरू केला आणि त्यात घवघवीत यश मिळवल्याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. ठरलेला मार्ग बदलून नवीन वाटेवर चालण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेशातील एका तरुणीने केला. तिनं एक कोटी रुपये पगाराच्या नोकरीची ऑफर सोडून स्टार्टअप सुरू केले. सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करत, कठोर परिश्रमातून ही तरुणी यशस्वी उद्योजिका बनली आहे. या तरुणीची वाटचाल आणि तिच्या स्टार्टअपविषयी सविस्तर जाणून घेऊया.
खरं तर कोणताही व्यवसाय सुरू करणं ही काही सोपी गोष्ट नाही. तुमच्याकडे हिंमत आणि सातत्य असेल तर कोणतंही काम सोपं होतं. उत्तर प्रदेशातील एका तरुणीच्या बाबतीत असंच घडलं. तिनं एक कोटी रुपये पगार असलेल्या नोकरीची ऑफर नाकारली आणि स्टार्टअप सुरू केलं. आज तिच्या कंपनीचा महसूल 40 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आता ती एक यशस्वी उद्योजिका बनली आहे.
advertisement
मुरादाबाद येथील आयुषीसाठी स्टार्टअपचा प्रवास सोपा नव्हता. नोकरीची ऑफर सोडल्यावर तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. पहिल्यांदा स्वतःचं आयुष्य सुरक्षित कर, असा सल्ला तिच्या कुटुंबियांनी दिला. पण स्वप्नपूर्तीसाठी तिने नोकरीकडे पाठ फिरवत स्टार्टअपच्या जगात प्रवेश केला. आरुषी टॅलेंट डिक्रिप्ट नावाच्या फर्मची संस्थापिका आणि सीईओ आहे. तिनं सांगितलं की, टॅलेंट डिक्रिप्ट हा असा प्लॅटफॉर्म आहे की, जो कंपन्यांना जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून, नवीन कर्मचाऱ्याची निवड करण्याचा ॲक्सेस देतो. कंपन्या उमेदवाराचा अनुभव आणि योग्यता पाहून त्याची निवड करू शकतात. युवकांना नोकरी मिळवून देण्यात हा प्लॅटफॉर्म सहाय्यक ठरला आहे.
advertisement
पण, हा प्रवास आरुषीसाठी नक्कीच सोपा नव्हता, आरुषीनं सांगितलं की, ``कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनीअरिंग केल्यावर माझ्या कॉलेजमधील अनेक विद्यार्थी जॉबसाठी इंटरव्ह्यू देत होते. मला अनेक कंपन्यांकडून जॉब ऑफर आल्या. देशातील एका मोठ्या कंपनीकडून सर्वात जास्त पॅकेज असलेली जॉब ऑफर मिळाली. मला एक कोटी रुपये पगार मिळणार होता. पण मी ही ऑफर नाकारली. कारण मला स्टार्टअप सुरू करायचं होतं. जॉब मिळत नाही किंवा इंटरव्हयू होत नसलेले मी अनेक युवक पाहिले होते. मग माझ्या मनात एक कल्पना आली आणि टॅलेंट डिक्रिप्टची सुरूवात झाली.``
advertisement
कंपनी सुरू झाली. पण बरीच कामं अजून बाकी होती. हा प्लॅटफॉर्म आयटी कंपन्यांना जोडणं हे सर्वात मोठं आव्हान होतं. आरुषी आणि तिच्या सहकारी सहसंस्थापकाची कोणत्याही कंपनीत कोणतीच ओळख नव्हती. त्यानंतर तिनं थेट कंपन्यांमध्ये जाऊन प्लॅटफॉर्मविषयी माहिती देण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी ती 30 कंपन्यांमध्ये गेली. पण तिला कंपनीत कुणीच जाऊ दिलं नाही. हा प्रकार एक आठवड्यापर्यंत चालला. मग ती तिच्या वडिलांसोबत गेली आणि एका आयटी कंपनीला तिच्याकडील सॉफ्टवेअर दाखवलं. मग एकामागून एक कंपन्या तिच्याशी जोडल्या गेल्या. आज हा स्टार्टअप वर्षाला 40 कोटी रुपयांचा महसूल जनरेट करतो. अशा पद्धतीनं आरुषीनं नोकरीऐवजी स्टार्टअपचा निवडलेला पर्याय यशस्वी ठरला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 03, 2024 6:31 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
Success story : 1 कोटीची नोकरी सोडून सुरु केला स्टार्टअप, UP मधील 'या' तरुणीची जगभर चर्चा


