Teachers Day 2025: एक असाही शिक्षक…! झोपडपट्टीतल्या मुलांना विनामूल्य शिक्षण, 260 शाळाबाह्य मुले शाळेत दाखल

Last Updated:

Teachers Day 2025: गेल्या पाच वर्षांत सुदर्शन चखाले यांनी 260 शाळाबाह्य मुलांना पुन्हा शाळेत दाखल केलं आहे. चखाले यांचं मुख्य काम भटक्या-विमुक्त समाज, विशेषतः पारधी वस्त्यांमध्ये आहे.

+
Teachers

Teachers Day: एक असाही शिक्षक…! झोपडपट्टीत जाऊन मुलांना विनामूल्य शिक्षण, 260 मुलांना शाळेत दाखला!

पुणे : शिक्षक हा फक्त ज्ञान देणारा नसतो, तर योग्य मार्ग दाखवणारा असतो. भारताला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष लोटली असली तरी आजही अनेक मुलं शाळेच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचलेली नाहीत. यामध्ये सर्वाधिक मुलं पारधी समाज आणि झोपडपट्ट्यांमधील आहेत. याच मुलांच्या आयुष्यात शिक्षणाचा उजेड पोहोचवण्याचं काम पुण्यातील सुदर्शन चखाले करत आहेत. झोपडपट्टी भागात जाऊन ते मुलांना शिकवतात. त्यांच्या याच कार्याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
सुदर्शन चखाले यांनी MSW (Master of Social Work) मधून आपल शिक्षण पूर्ण केलं आहे . सुदर्शन यांचं झोपडपट्टीत बालपण गेल्याने अशा भागातील मुलांच्या प्रश्नांची त्यांना चांगली जान आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी 260 शाळाबाह्य मुलांना पुन्हा शाळेत दाखल केलं आहे. सध्या कर्वेनगर, संभावस्ती, येरवडा, दांडेकर पूल आणि लोहिया नगर परिसरात ते हा उपक्रम राबवत आहेत.
advertisement
260 शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल
सुदर्शन चखाले यांनी आत्तापर्यंत 260 शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल केलं आहे. मात्र, अनेक मुलांकडे जन्मदाखला नसल्याने आधार कार्ड मिळत नाही आणि त्यामुळे शाळेत प्रवेश मिळवणं कठीण होतं. या समुदायाला आजही नागरिकत्वाच्या हक्कांसाठी झगडावं लागत असून सरकारने यावर तातडीने उपाययोजना करायला हव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
advertisement
ज्योतिबा सावित्रीबाई फाउंडेशन आणि इकोनेट या संस्थांच्या माध्यमातून त्यांचा हा उपक्रम राबवला जातो. चखाले यांचं मुख्य काम भटक्या-विमुक्त समाज, विशेषतः पारधी वस्त्यांमध्ये आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आज अनेक शाळाबाह्य मुलं नियमितपणे शाळेत जाऊ लागली आहेत.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
Teachers Day 2025: एक असाही शिक्षक…! झोपडपट्टीतल्या मुलांना विनामूल्य शिक्षण, 260 शाळाबाह्य मुले शाळेत दाखल
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement