CA Result 2025: मोठा भाऊ, मोठाच असतो! स्वत:चं शिक्षण सोडलं अन् लहान्या भावाला बनवलं CA
- Published by:Mohan Najan
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
नुकताच (सीए) परीक्षेचा निकाल जाहीर झाला. शेतकऱ्याचा मुलगा तुषार दिगंबर पडूळ याने सीए होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
छत्रपती संभाजीनगर : नुकताच सीए परीक्षेचा निकाल जाहीर झाला. आई-वडिलांची जिद्द, भावाची साथ, आणि स्वतःची मेहनत या सगळ्यांच्या जोरावर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसावंगी गावातील एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा तुषार दिगंबर पडूळ याने सीए होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
दिगंबर पडूळ यांना 3 एकर कोरडवाहू शेती, त्यात 3 मुलांच्या शिक्षणासह कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. काटकसर करून 3 मुलांचे शिक्षण सुरू होते. सर्वात मोठा मुलगा शेखर पडूळ हा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करतो तर दुसरा शरद फार्मसीचे शिक्षण आणि तिसरा तुषार सीएची तयारी करीत होता. घरात दिवसेंदिवस आर्थिक अडचणी वाढत होत्या, त्यातच दिगंबर पडूळ यांची बायपास शस्त्रक्रिया झाली, यावेळी परिस्थिती समजून मधल्या मुलाने, म्हणजेच शरदने स्वतःचे शिक्षण थांबवून घराला आधार आणि दोन्ही भावांचे शिक्षण आणि स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी थेट नोकरी सुरू केली.
advertisement
तुषारचे शालेय शिक्षण वर्ग पहिला ते पाचवीपर्यंतचे गावातल्या जिल्हा परिषद शाळेत झाले. लाडसावंगी गावातीलच जनार्दन पडूळ यांच्याकडे गणित विषयाचे ट्यूशन केले. गणित विषय उत्तम असल्याने तुषारला कन्नड येथील जवाहर विद्यालयात प्रवेश मिळाला. 6 वी ते 10 वी त्याचे शिक्षण याच शाळेत झाले. त्यानंतर विद्यापीठातील सहाय्यक कुलसचिव डॉ. पंजाबराव पडूळ यांनी मार्गदर्शन केले.
advertisement
सीए बनण्यासाठी शहरातील विवेकानंद महाविद्यालयात बीकॉमला प्रवेश घेतला, आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे तुषारने सीए केदार जोशी यांच्या कार्यालयात काम सुरू केले त्यांनी राहण्यापासून संपूर्ण व्यवस्था करून दिली. या सर्वांचे मार्गदर्शन व सहकार्य तसेच मेहनत आणि भावाच्या योगदानामुळे हे यश मिळवले असल्याचे तुषारने लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
July 08, 2025 8:11 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
CA Result 2025: मोठा भाऊ, मोठाच असतो! स्वत:चं शिक्षण सोडलं अन् लहान्या भावाला बनवलं CA