CA Result 2025: वडिलांचं निधन, पण ती खचली नाही, सोलापूरची मोक्षा पहिल्याच प्रयत्नात सीए!

Last Updated:

CA Result 2025: नुकताच सीए परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये सोलापूरच्या लेकीने पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश संपादित केलंय.

+
CA

CA Result 2025: वडिलांचं निधन, पण ती खचली नाही, सोलापूरची मोक्षा पहिल्याच प्रयत्नात सीए!

सोलापूर : नुकतेच देशातील सर्वात अवघड मानल्या जाणाऱ्या सनदी लेखापाल (सीए) परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये सोलापूरच्या मोक्षा बेद हिने घवघवीत यश संपादन केलंय. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात सीए होणाऱ्या मोक्षाने सोलापुरातून पहिला क्रमांक पटकावला आहे. वडिलांचं निधन आणि प्रतिकूल परस्थितीत तिने जिद्दीने मोठं यश मिळवलं असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आपल्या याच प्रवासाबाबत लोकल18 सोबत बोलताना मोक्षाने माहिती दिलीये.
सोलापूर शहरातील मंगळवार पेठेत राहणारी मोक्षा बेद ही गेल्या 5 वर्षांपासून सीए परीक्षेची तयारी करत होती. वडिलांचं छत्र हरपल्यानंतर परस्थितीशी झगडत तिने अभ्यास सुरूच ठेवला. रोज सहा ते सात तास अभ्यासाला दिला. याच वेळी सोलापुरातील एका खासगी कंपनीत ती काम करत होती. नुकतेच मे 2025 मध्ये झालेल्या सीए परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून तिने 600 पैकी 391 गुण मिळवत घवघवीत यश संपादित केलंय.
advertisement
सीए परीक्षेतमध्ये मिळालेल्या गुणांपेक्षा आपला रँक किती आहे हे महत्त्वाचं आहे. पहिल्याच प्रयत्नात यश मिळाल्याने मी अत्यंत आनंदी आहे, असं मोक्षा सांगते. दरम्यान, सोलापूर सेंटरवरून 156 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी 26 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात मोक्षाने सोलापुरातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
advertisement
संपूर्ण भारतातून घेण्यात आलेल्या सीए परीक्षेस एकूण एक लाख 42 हजार 402 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 14 हजार 247 विद्यार्थी चार्टर्ड अकौंटंट म्हणून पात्र ठरले. यंदा या परीक्षेचा निकाल 10 टक्के इतका लागला आहे. सीए फाउंडेशनचे 82 हजार 662 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील 12 हजार 474 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सीए परीक्षेची तयारी करत असताना 5 वर्षात मोक्षा यांना आई, भाऊ आणि शिक्षकांची मिळालेला साथ मिळाली. त्यांच्या सहकार्य आणि मार्गदर्शनामुळेच मी सीएची परीक्षा उत्तीर्ण झाले, असं मोक्षा सांगतात.
मराठी बातम्या/करिअर/
CA Result 2025: वडिलांचं निधन, पण ती खचली नाही, सोलापूरची मोक्षा पहिल्याच प्रयत्नात सीए!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement