UPSC Result: सोलापूरकरांचा नाद हाय का...पठ्ठ्याची सातव्या क्रमांकानं देशपातळीवर निवड!

Last Updated:

तो एका सर्वसामान्य घरातला लेक. 21 सप्टेंबर रोजी लागलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)च्या परीक्षेत त्याची निवड झाली. अशपाक मुलाणी असं या बुद्धिवंत तरुणाचं नाव.

+
पहिल्याच

पहिल्याच प्रयत्नात यश.

प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून आज लाखो तरुण, तरुणी वर्षानुवर्षे मेहनत करतात. एकवेळचं जेवण चूकलं तरी चालेल पण अभ्यासाची वेळ चुकायला नको, असा त्यांचा दिवसरात्र दिनक्रम असतो. काहीजण मोठ्या जिद्दीनं स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होतात. अनेक तास अभ्यास करून, जागरण करून त्यांच्या डोळ्यांभोवती आलेले काळे घेर आपण यशस्वी झालोय हा निकाल पाहून आनंदाश्रूंनी ओलसर होतात. हा आनंद शब्दात व्यक्तच होऊ शकत नाही. सोलापूरच्या पठ्ठ्यानं आपल्या आई-वडिलांना हेच सुख मिळवून दिलं.
advertisement
तो एका सर्वसामान्य घरातला लेक. 21 सप्टेंबर रोजी लागलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)च्या परीक्षेत त्याची निवड झाली. अशपाक मुलाणी असं या बुद्धिवंत तरुणाचं नाव. Ministry of Corporate Affairs या विभागात Assistant Director serious fraud investigation office (SFIO) या पदी त्याची निवड झाली. यासाठी त्यानं देशभरातून सातवा क्रमांक पटकावला. त्याचं वय आहे फक्त 24 वर्षे आणि पहिल्याच प्रयत्नात त्यानं या यशाला गवसणी घातलीये.
advertisement
अशपाकचं मूळ गाव देवडी. प्राथमिक शिक्षण इथंच झालं. मग पुढच्या शिक्षणासाठी त्यानं सोलापूरहून पुणे गाठलं. पुण्यात येताच अधिकारी होण्याचं स्वप्न तो पाहू लागला. त्याला झोपच लागेना. कॉलेजच्या अभ्यासासोबच त्यानं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. त्याचे वडील प्राथमिक शाळेचे शिक्षक, तर आई शेतकरी. त्यानं लहाणपणी सावकारांचं कर्ज फेडण्यासाठी वडिलांना झिजताना पाहिलं. त्याला ही परिस्थिती बदलायची होती. म्हणूनच तो जिद्दीनं अक्षरश: पेटून उठला. त्याला वडिलांचं प्रचंड प्रोत्साहन मिळालं.
advertisement
गणेश शिरसाट सरांच्या मोलाच्या मार्गदर्शनानं त्याचा अभ्यास उत्तम झाला. अशपाकनं सांगितलं, '2022 साली माझं ग्रॅज्युएशन झालं. त्यानंतर लोकसेवा आयोगाकडून (MPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षेत राज्यातून माझा आठवा क्रमांक होता. ते पद मिळाल्यानंतर काम करत असतानाच मी यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. Ministry of Corporate Affairs या विभागात Assistant Director serious fraud investigation office (SFIO) या पदी नुकतीच निवड झाली आहे.' यूपीएससी या अत्यंत अवघड परीक्षेत उत्तीर्ण होणं हेच अतिशय अवघड आहे. त्यात पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा पार करून देशात सातवा क्रमांक मिळवणं हे खरोखर कौतुकास्पद आहे. अशपाक मुलाणी यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!
view comments
मराठी बातम्या/करिअर/
UPSC Result: सोलापूरकरांचा नाद हाय का...पठ्ठ्याची सातव्या क्रमांकानं देशपातळीवर निवड!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement