Upsc Success Story : तीन वेळा अपयश, तरी हार नाही मानली, छत्रपती संभाजीनगरच्या तेजस्वीने UPSC परीक्षेत मिळवली 99 वी रँक, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
UPSC Success Story : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा म्हणजेच यूपीएससीचा निकाल काल जाहीर झालेला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील तेजस्वी देशपांडे हिने देशांमध्ये 99 वी रँक मिळवली आहे.
छत्रपती संभाजीनगर : अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असतं की आपण सरकारी नोकरी करावी. त्यासाठी बरेचशे विद्यार्थी हे एमपीएससी किंवा यूपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा म्हणजेच यूपीएससीचा निकाल काल जाहीर झालेला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील तेजस्वी देशपांडे हिने देशांमध्ये 99 वी रँक मिळवली आहे.
तेजस्वी हिने आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण नाथ व्हॅली स्कूलमध्ये पूर्ण केलं. पुढील शिक्षणासाठी ती दिल्लीला गेली आणि तिने लेडी श्रीराम कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयात पदवी मिळवली. यूपीएससीची तयारी करण्याची ठाम इच्छा निर्माण झाली आणि तिने दिल्लीमध्येच राहून अभ्यास सुरू केला. 2021 पासून ती या परीक्षेची तयारी करत होती. यामध्ये तिला तीन वेळा अपयश आलं पण तरीसुद्धा हार न मानता तयारी सुरू ठेवली आणि तिला यामध्ये यश आलेले आहे. तिचा देशामधून 99 क्रमांक आलेला आहे.
advertisement
यामध्ये मला बऱ्याच अडचणी आल्या पण त्या सर्व अडचणींवरती मात करत मी तयारी सुरू ठेवली. तसेच मी अभ्यास करताना सोशल मीडियापासून दूर होते. काम असेल तेव्हाच मोबाईलचा वापर करत होते आणि माझ्या मनात ठाम निर्णय झाला होता की मला कुठल्याही परिस्थितीमध्ये यूपीएससी परीक्षा पास करायची आहे आणि ती मी पास झालेली आहे. याचा मला खूप आनंद झालेला आहे, असं तेजस्वी सांगते.
advertisement
तेजस्वी यूपीएससी परीक्षेमध्ये पास झाली आहे याचा मला एक वडील म्हणून खूप अभिमान आहे. तिने यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि तिची अगदी कॉलेजला असल्यापासून इच्छा होती की हीच परीक्षा मला पास व्हायची आणि तिने ते करून दाखवलं आहे, असं तेजस्वीचे वडील सांगतात.
तेजस्वीच्या सरांचा आम्हाला फोन आला होता. सरांनी जेव्हा सांगितलं की ती पास झालेली आहे आणि तिचा देशांमध्ये 99 वा नंबर आलेला आहे हे ऐकून आम्हाला खूप आनंद झाला. आमच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू होते. एक आई म्हणून मला तुझा खूप अभिमान वाटतो, असं तिच्या आईने सांगितलं आहे.
advertisement
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
April 23, 2025 3:58 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
Upsc Success Story : तीन वेळा अपयश, तरी हार नाही मानली, छत्रपती संभाजीनगरच्या तेजस्वीने UPSC परीक्षेत मिळवली 99 वी रँक, Video