बहिणीचं अफेअर कळालं, नराधम भावाने केलं ब्लॅकमेल, चाकूचा धाक दाखवून दोनदा अत्याचार

Last Updated:

Crime News: एका २९ वर्षीय तरुणाने रक्ताच्या नात्याला काळिमा फासला आहे. आरोपीनं आपल्या सख्ख्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केला आहे.

AI Generated Photo
AI Generated Photo
एका २९ वर्षीय तरुणाने रक्ताच्या नात्याला काळिमा फासला आहे. आरोपीनं आपल्या सख्ख्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केला आहे. पीडित तरुणीचं प्रेम प्रकरण भावाला कळालं होतं. याचा फायदा घेत आरोपीनं पीडितेवर दोन वेळा लैंगिक अत्याचार केला. दुसऱ्यांदा अत्याचार झाल्यानंतर पीडित तरुणीने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
ही घटना गुजरातमधील भावनगर जिल्ह्यात घडली आहे. २९ वर्षीय आरोपीनं त्याच्याच बहिणीला चाकूचा धाक दाखवून ब्लॅकमेलिंग आणि बलात्कार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने मागील दीड महिन्यांच्या कालावधीत दोनदा बहिणीवर बलात्कार केला. दुसऱ्या घटनेनंतर, पीडितेने लैंगिक हिंसाचाराबाबतच्या १८१ या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल केला. बुधवारी, तिला तलाजा पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. जिथे तिने तिच्या भावाविरुद्ध एफआयआर दाखल केला.
advertisement
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, २२ वर्षीय महिलेचे गेल्या तीन वर्षांपासून गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते, जो तिच्या भावाला ओळखत होता. जेव्हा आरोपी भावाला बहिणीच्या प्रेम प्रकरणाची माहिती मिळाली, तेव्हा त्याने स्वत:च्या बहिणीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. १३ जुलै आणि २२ ऑगस्ट रोजी पीडिता घरी एकटी असताना, आरोपीने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. तसेच आरोपीनं बहिणीला सिगरेटचे चटके दिल्याची देखील माहिती समोर आली आहे. आरोपीनं दुसऱ्या बहिणीला आपल्या वासनेचा शिकार बनवल्यानंतर पीडितेनं १८१ या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल केला आणि पोलिसांना ही बाब कळवली.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही अविवाहित असून ती तिच्या आईवडिलांसह, तिचा भाऊ, वहिनी आणि त्यांच्या मुलासह राहत होती. आरोपी कार चालक म्हणून काम करत होता. आरोपीनं जेव्हा पहिल्यांदा पीडितेवर अत्याचार केला. तेव्हा त्याची पत्नी माहेरी गेली होती. दुसऱ्या वेळी आरोपीची पत्नी कामानिमित्त घराबाहेर होती. या दोन्ही वेळी बहिणीला घरी एकटं पाहून आरोपीनं अत्याचार केला.
advertisement
पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पीडितेला धमकावण्यासाठी वापरलेला चाकू आणि गुन्ह्यादरम्यान त्याने घातलेले कपडे जप्त करण्यात आले आहेत. आरोपी आणि पीडित दोघांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे आणि पोलिसांनी त्यांचे जबाब नोंदवले आहेत. भारतीय न्याय संहिताच्या कलम 64(2)(F)(M) आणि 115(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
बहिणीचं अफेअर कळालं, नराधम भावाने केलं ब्लॅकमेल, चाकूचा धाक दाखवून दोनदा अत्याचार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement