कष्टाची कमाई क्षणात गेली, ना परतावा मिळाला, ना मुद्दल; सांगलीत 'शेअर मार्केट'च्या नादात महिलेची मोठी फसवणूक
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Sangali Crime : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून सांगलीतील एका महिलेची तब्बल
Sangali Crime : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून सांगलीतील एका महिलेची तब्बल 13 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कविता विनोद चव्हाण (वय-43, रा. सांगली) यांनी पोलिसांत ही तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2020 पासून त्यांना फसवणुकीचा अनुभव येत आहे. सचिन सिद्धनाथ रोकडे, मिलिंद बाळासाहेब गाडवे, अविनाश बाळासाहेब पाटील आणि इरगोंडा बागोंडा पाटील या संशयितांनी 'एसएस मार्क ट्रेडिंग' नावाची कंपनी स्थापन केली होती.
फसवणुकीची पद्धत
या चौघांनी कविता चव्हाण यांना त्यांच्या कंपनीत पैसे गुंतवल्यास शेअर मार्केटमधून चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवले. त्यांच्या भूलथापांना बळी पडून कविता चव्हाण यांनी चेक आणि रोख रक्कम मिळून एकूण 14 लाख रुपये दिले.
advertisement
सुरुवातीला परतावा, नंतर टाळाटाळ
गुंतवणूक केल्यानंतर सुरुवातीच्या चार महिन्यांत त्यांना दरमहा 20 हजार रुपये असे एकूण 80 हजार रुपये परतावा म्हणून मिळाले. पण त्यानंतर मात्र त्यांना एकही पैसा परत मिळाला नाही. अनेक वेळा पैशाची मागणी करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
advertisement
हे ही वाचा : महिलांनो, सावधान! साताऱ्यात 'सोन्याची वीट' देणारी टोळी सक्रिय, तुमची 'ही' चूक पडेल महागात
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 19, 2025 11:24 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
कष्टाची कमाई क्षणात गेली, ना परतावा मिळाला, ना मुद्दल; सांगलीत 'शेअर मार्केट'च्या नादात महिलेची मोठी फसवणूक