'भरधाव कार, थरारक अपघात'; कोल्हापुरात महिला आणि मुलाला जोरदार धडक, कारचालक फरार!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Kolhapur Road Accident : कोल्हापूर शहरात फुलेवाडी रिंगरोडवरील बोंद्रेनगर परिसरात एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या महिला आणि शाळकरी मुलाला जोरदार धडक दिली. हा थरारक...
Kolhapur Road Accident : कोल्हापूर शहरात फुलेवाडी रिंगरोडवरील बोंद्रेनगर परिसरात एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या महिला आणि शाळकरी मुलाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून, मुलगा किरकोळ जखमी झाला आहे.
सीसीटीव्हीमध्ये थरारक क्षण कैद
हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. फुटेजमध्ये महिला आणि मुलगा रस्त्याच्या कडेने शांतपणे चालत असताना, मागून आलेल्या भरधाव कारने त्यांना धडक दिल्याचे स्पष्ट दिसते. धडक इतकी जोरदार होती की महिला हवेत उडून रस्त्यावर आदळली.
नागरिकांनी केली मदत
अपघातानंतर परिसरातील नागरिक तात्काळ मदतीसाठी धावले. त्यांनी जखमी महिलेला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून, मुलाला किरकोळ दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी अपघातग्रस्त कारची ओळख पटवण्याचे काम सुरू केले असून, फरार चालकाचा शोध घेतला जात आहे.
advertisement
परिसरात संतापाचे वातावरण
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. रिंगरोडवर वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे वारंवार अपघात होत असल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
हे ही वाचा : नांदेड हादरलं! धारदार कोयत्याचे 19 वार, बापानेच मुलाला केलं छिन्नविछिन्न, झोपलेल्या जागी केली हत्या
advertisement
हे ही वाचा : GFच्या सांगण्यावरून लिव्ह इन पार्टनरचा खून, 100 KM दूर नदीत फेकला मृतदेह, धडकी भरवणारा कांड!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 22, 2025 3:40 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
'भरधाव कार, थरारक अपघात'; कोल्हापुरात महिला आणि मुलाला जोरदार धडक, कारचालक फरार!