नांदेड हादरलं! धारदार कोयत्याचे 19 वार, बापानेच मुलाला केलं छिन्नविछिन्न, झोपलेल्या जागी केली हत्या

Last Updated:

Father Killed Son in Nanded: नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका व्यक्तीने आपल्या पोटच्या मुलाची निर्घृण हत्या केली आहे.

News18
News18
Father Killed Son in Nanded: नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका व्यक्तीने आपल्या पोटच्या मुलाची निर्घृण हत्या केली आहे. मुलगा रात्री घरात झोपलेला असताना वडिलांनी मुलांवर कोयत्याने सपासप वार केले आहेत. आरोपीनं तब्बल १९ वेळा वार करून मुलाचा जीव घेतला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने आपल्या मुलावर बिबट्याने हल्ला केला. याच हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला. पण त्याचा हा बनाव फार काळ टिकू शकला नाही. हत्येच्या पाच दिवसांनी पोलिसांनी आरोपीचं बिंग फोडलं आहे.
जनार्दन जाधव असं हत्या झालेल्या 35 वर्षीय मुलाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी 65 वर्षीय आरोपी वडील उत्तमराव जाधव याला अटक केली आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी शनिवारी आरोपी बापावर अटकेची कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास जनार्दन जाधव याचा मृतदेह शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये आढळला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. यावेळी आरोपी वडिलांनी मुलावर बिबट्याने हल्ला केल्याचं सांगितलं. पण मयताच्या शरीरावर अनेक वार होते. त्यामुळे पोलिसांना वडिलांवर संशय आला. तसेच मृत्यूच्या वेळी आरोपी बाप आणि जनार्दन यांचं लोकेशन एकाच ठिकाणी असल्याचं पोलिसांना दिसून आलं. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी उत्तमराव जाधव यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने हत्येची कबुली दिली.
advertisement
उत्तमराव जाधव यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांचा मुलगा जनार्दन दारुच्या व्यसनामुळे वारंवार त्यांच्याशी भांडण करत होता. तो दारू पिऊन घरात गोंधळ घालायचा आणि आई-वडिलांना मारहाण करायचा. हत्येच्या आदल्या रात्री त्याने मला आणि माझ्या पत्नीला मारहाण केली होती. एवढंच नव्हे तर त्याने दोघांनाही घरातून बाहेर काढलं होतं. याचाच राग मनात धरून उत्तमरावने मुलाला संपवण्याचा निर्णय घेतला.
advertisement
घटनेच्या दिवशी मुलगा जनार्दन शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये झोपला होता. यावेळी उत्तमराव त्याठिकाणी गेले. त्यांनी धारदार कोयत्याने वार करत मुलाची हत्या केली. ही हत्या इतकी निर्दयी होती की बापाने तब्बल १९ वार केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नांदेड हादरलं! धारदार कोयत्याचे 19 वार, बापानेच मुलाला केलं छिन्नविछिन्न, झोपलेल्या जागी केली हत्या
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement