10 वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, कुऱ्हाडीने केले सपासप वार; तुळजापूर हादरलं
- Published by:Prachi Amale
Last Updated:
वडिलांच्या अपघाती मृत्यूचा बदला घेण्यासाठी हा खून करण्यात आल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
धाराशिव: तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे एका ३५ वर्षीय पान टपरी चालकाचा कुऱ्हाडीने वार करत निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने मयत व्यक्तीवर कुऱ्हाडीने वार करतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये कैद झाली असून एकच खळबळ उडाली आहे. गुरुसिद्धप्पा दहीटणे (वय ३५) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. वडिलांच्या अपघाती मृत्यूचा बदला घेण्यासाठी हा खून करण्यात आल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
याप्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी तात्काळ कारवाई करत निखिल कांबळे नामक आरोपीला पाठलाग करत ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयत गुरुसिद्धप्पा दहीटणे हे केशेगाव येथे पान टपरी चालवत होते. दहा वर्षांपूर्वी आरोपी निखिल कांबळे याच्या वडिलांचा मयत दहीटणे यांच्या पान टपरीवर विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्याच घटनेचा राग आरोपी निखिलच्या मनात होता. वडिलांच्या मृत्यूला गुरुसिद्धप्पा यांना जबाबदार धरून, त्याच रागातून आरोपीने हा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
advertisement
बदला घेण्यासाठी खून केल्याची प्राथमिक माहिती
निखिल कांबळे याच्या वडिलांचा काही वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. त्या अपघातासाठी आरोपी जबाबदार असल्याचा संशय होता. त्या घटनेचा बदला घेण्यासाठीच हा खून करण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी निखिल कांबळे याला ताब्यात घेतले. याप्रकरणी अधिक तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.
advertisement
परिसरात भीतीचे वातावरण
या निर्घृण हत्येमुळे केशेगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही याबाबत तपास सुरू आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 01, 2025 5:28 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
10 वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, कुऱ्हाडीने केले सपासप वार; तुळजापूर हादरलं


