Ahilya Nagar Crime News : पती-पत्नीच्या वादात मध्यस्थ अन् डाव साधला! ठाकरे गटाच्या नेत्याला लैंगिक अत्याचारात अटक, नगरमध्ये खळबळ
- Reported by:Sahebrao Kokane
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Crime News : शिवसेना ठाकरे गटाला आता अहिल्यानगरमध्ये धक्का बसला आहे. अहिल्यानगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नगर शहरप्रमुख किरण काळे यांना बलात्काराच्या आरोपात अटक करण्यात आली आहे.
अहिल्यानगर: शिवसेना ठाकरे गटाला आता अहिल्यानगरमध्ये धक्का बसला आहे. अहिल्यानगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नगर शहरप्रमुख किरण काळे यांना बलात्काराच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. काळे यांच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी रात्री पोलिसांनी त्यांना अटक केली.
बलात्काराची तक्रार दाखल करणाऱ्या महिलेने पोलीसांकडे तक्रार दिल्यानंतर आपण विष घेतल्याचे सांगितले. यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणामुळे नगर शहरातील राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला असून शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वावर गंभीर आरोप लागल्यामुळे पक्षाचीही गोची झाल्याची चर्चा सुरू आहे.
प्रकरण काय?
समोर आलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पीडित महिला आणि तिच्या पतीमध्ये सतत वाद, भांडणं सुरू होत असे. या वादात मदत करण्याच्या निमित्ताने किरण काळे हे पीडित महिलेच्या संपर्कात आले. मदतीच्या आमिषातून काळे यांनी महिलेवर अत्याचार केल्याची तक्रार करण्यात आली. तक्रारीनुसार, किरण काळे यांनी 2023 ते 2024 या दरम्यानच्या कालावधीत काळे यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात अत्याचार केले. ही गोष्ट कोणाला कळली तरी जीवे मारण्याची धमकी दिली, असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
advertisement
काही दिवसांपूर्वी काळेंनी उघड केलेला घोटाळा...
काही दिवसांपूर्वीच नगर शहरातील रस्ते विकास कामांमधील कथित गैरव्यवहारासंदर्भात किरण काळे यांनी माहिती उजेडात आणली होती. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती. या घडामोडींमुळे काळे अचानक चर्चेत आले होते.
view commentsLocation :
Ahmadnagar (Ahmednagar),Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Jul 22, 2025 9:24 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Ahilya Nagar Crime News : पती-पत्नीच्या वादात मध्यस्थ अन् डाव साधला! ठाकरे गटाच्या नेत्याला लैंगिक अत्याचारात अटक, नगरमध्ये खळबळ









