Crime News : आधी आमिष दाखवून अत्याचार, नंतर धर्मांतरासाठी दबाव; पोलीस ठाण्यात पीडितेचा आक्रोश
- Published by:Rahul Punde
- trending desk
Last Updated:
Crime News : अमेठीमध्ये प्रेमप्रकरणाचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका तरुणाने मुलीला आमिष दाखवून महिनाभर तिच्यावर बलात्कार केला.
अमेठी : उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये एका मुलाने सज्ञान मुलीला लग्नाचं आमिष दाखवून पळवून नेलं व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. एक महिन्यानं परत आल्यावर त्यानं तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. यामुळे घाबरलेल्या मुलीनं त्याच्या तावडीतून सुटून स्वतःचं घर गाठलं. तिनं दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
स्त्रियांची लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक, लैंगिक अत्याचार या घटना समाजात वाढू लागल्या आहेत. उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये याच स्वरूपाच्या एका गुन्ह्याची नोंद झाली आहे. एका विशेष समुदायाच्या युवकानं 18 वर्षांच्या सज्ञान मुलीला लग्नाचं आमिष दाखवून पळवून नेलं, मात्र तिच्यावर एक महिनाभर लैंगिक अत्याचार करत राहिला. त्यानंतर तिच्यावर धर्म बदलण्यासाठी दबाव टाकू लागला. या गुन्ह्यांबद्दल पीडित मुलीनं दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
advertisement
अमेठीतील रामगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढेमा बाजार इथली ही घटना आहे. पीडित मुलीनं दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी तरुणही त्याच गावात राहतो. काही दिवसांपूर्वी आरोपी तिला लग्नाचं आमिष दाखवून घरातून पळवून घेऊन गेला. एक महिनाभर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर आता तो तिच्यावर धर्म बदलण्यासाठी दबाव टाकतो आहे. त्यात त्याचे कुटुंबियही त्याला साथ देत आहेत. पीडित मुलीनं त्याला विरोध केला असता आरोपीनं तिला मारहाण केली व जीवे मारण्याची धमकीही दिली.
advertisement
वाचा - सापाच्या वादातून पती-पत्नीला बेदम मारहाण! पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू
पीडित तरुणी आरोपीच्या वागण्यामुळे दुखावली होती, त्यातच तो तिच्यावर धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकत होता. त्यामुळे त्याच्या तावडीतून सुटका करण्याची संधी ती शोधत होती. अखेर एकेदिवशी संधी मिळताच ती शौचाला जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडली आणि थेट आई-वडिलांकडे आली. तिनं घडलेला सगळा प्रकार आईला सांगितला. मग कुटुंबियांसोबत तिनं पोलिसांत तक्रार दाखल केली. आरोपी व त्याच्या कुटुंबियांविरुद्ध त्यांनी तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनेची चौकशीही सुरू केली आहे. आपण एक महिन्यापूर्वी तक्रार दाखल करूनही पोलिसांनी आता महिन्याभरानंतर गुन्हा दाखल केल्याचा आरोप पीडित मुलीनं केला आहे. अजून चौकशी सुरू आहे असं सांगून पोलीस तिला टोलवाटोलवीची उत्तरं देत होते, असं तिचं म्हणणं आहे.
advertisement
पोलिसांनी आता आरोपीवर गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे. त्यात गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपी व कुटुंबियांवर कारवाई केली जाईल.
Location :
uttar pradesh
First Published :
August 26, 2024 11:04 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Crime News : आधी आमिष दाखवून अत्याचार, नंतर धर्मांतरासाठी दबाव; पोलीस ठाण्यात पीडितेचा आक्रोश