Jalgaon News : सापाच्या वादातून पती-पत्नीला बेदम मारहाण! पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू; जळगावमधील घटना

Last Updated:

Jalgaon News : संतप्त नातेवाईकांनी मृतदेह पोलीस स्टेशनला आणून मारहाण करणाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची केली मागणी केली आहे.

News18
News18
जळगाव, (इम्तियाज अहमद, प्रतिनिधी) : गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या प्रकारची गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसत आहे. किरकोळ कारणातून थेट जीव घेण्यापर्यंतचे प्रकार घडत आहेत. अशाच एका प्रकाराने जळगाव जिल्हा हादरला आहे. जिल्ह्यात किरकोळ कारणातून पती-पत्नीला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली. यात गंभीर जखमी झालेल्या पुरुषाचा मृत्यू झाला आहे.
काय आहे घटना?
जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातल्या मनुर येथे मारलेला साप घरासमोर फेकल्याच्या वादातून पती-पत्नीला मारहाण केल्याची घटना समोर आली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेले विलास पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान संताप झालेल्या नातेवाईकांनी मृतदेह थेट पोलीस स्टेशनला आणत मारहाण करणाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर वडिलांचा मृतदेह पाहून चिमुरडीने पोलीस स्टेशनमध्ये हंबरडा फोडला.
view comments
मराठी बातम्या/जळगाव/
Jalgaon News : सापाच्या वादातून पती-पत्नीला बेदम मारहाण! पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू; जळगावमधील घटना
Next Article
advertisement
Eknath Shinde Sharad Pawar : शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', पाहा Video
शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'',
  • शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', Vi

  • शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', Vi

  • शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', Vi

View All
advertisement