भाजी चिरण्यावरून वाद, मित्राला संपवलं; कोल्हापूर हादरलं
- Published by:Prachi Amale
Last Updated:
वाद सोडवण्यास गेला एकजण जखमी झाला असून हा खून दारूच्या नशेतून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे .
कोल्हापूर : भाजी चिरण्याच्या किरकोळ कारणावरून परप्रांतीय तरूणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर वाद सोडवण्यास गेला एकजण जखमी झाला असून हा खून दारूच्या नशेतून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे .
समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री ९ वाजण्यासुमार घडली. या हल्ल्यात मंगल बिभीषण मांझी वय ३५ रा हा मयत झाला तर संजय पितांबर नेहाल हा जखमी झाला. आरोपीस शिरोली पोलिसानी घटनास्थळावरून ताब्यात घेतले.
घटनास्थळ व पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार संभापूर ता हातकणंगले येथील बिरदेव मंदिराच्या मागील बाजूस भाड्याच्या घरात राहणाऱ्या दोन परप्रांतीय कामगारांच्यात भाजी चिरण्याच्या किरकोळ कारणावरून जोरदार हाणामारी झाली या मारहाणीत आरोपी देवाश्री प्रफुल्लश्री चंदन ( वय २६ मुळ गाव बाराघर पाटणा सध्या राहणार संभापूर ता हातकणंगले ) याने रागाच्या भरात मंगल मांझी याच्यावर चाकूने हल्ला करून त्याला भोसकले त्या तो गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेने परिसर हादरून गेला.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
November 25, 2025 9:42 PM IST


