advertisement

तुमचे सर्व काही बुडेल, चुकूनही करू नका व्यवहार; बाजार बंद होताच BSEकडून नोटीस, शेअर्समध्ये संशयास्पद हालचाल

Last Updated:

Share Market: अवघ्या महिनाभरात 100% उसळी घेतलेल्या Silverline Technologies या शेअरबाबत BSE ने गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

News18
News18
मुंबई: एका शेअरमध्ये अवघ्या महिनाभरात 100 टक्क्यांची उसळी घेतल्यानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने (BSE) थेट गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून एक्सचेंजने स्पष्ट केलं की संबंधित शेअरबाबत अनधिकृत आणि संशयास्पद गुंतवणूक सल्ले मोठ्या प्रमाणात फिरत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
Silverline Technologies Ltd या शेअरने गेल्या महिन्यात जवळपास दुप्पट झेप घेतली. 16 फेब्रुवारी 2026 रोजी हा शेअर 5 टक्क्यांच्या वाढीसह 16.15 रुपयांवर बंद झाला.
केवळ भावच नव्हे, तर व्यवहाराचं प्रमाण (व्हॉल्युम)ही अचानक वाढलं. याआधी दररोज सरासरी सुमारे 31 लाख शेअर्सची खरेदी-विक्री होत होती. आता हा आकडा थेट 1 कोटी शेअर्सपर्यंत पोहोचला आहे. एवढी झपाट्याची वाढ ही बाजारातील सट्टेबाजी किंवा कृत्रिम हालचालींचा इशारा असू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
advertisement
WhatsApp-टेलिग्रामवर सल्ल्यांचा पूर
BSE च्या माहितीनुसार, WhatsApp, Telegram, SMS, कॉल्स आणि YouTube यांसारख्या माध्यमांवरून या शेअरबाबत खरेदी-विक्रीचे संदेश पसरवले जात आहेत. “हाय रिटर्न” किंवा “गारंटीड प्रॉफिट”चे दावे करून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
एक्सचेंजने स्पष्ट केलं आहे की Silverline Technologies Ltd (Scrip Code: 500389) संदर्भात फिरणारे हे संदेश अनधिकृत आणि नोंदणीकृत नसलेल्या संस्थांकडून पसरवले जात आहेत. अशा सल्ल्यावर आधारित व्यवहार टाळावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.
advertisement
शेअरहोल्डिंगची धोकादायक रचना
एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, कंपनीत प्रमोटरांची हिस्सेदारी जवळपास नगण्य आहे. विदेशी (FII) आणि देशांतर्गत (DII) संस्थात्मक गुंतवणूकदारांचाही सहभाग नाही. सुमारे 94 टक्के हिस्सेदारी ही सर्वसामान्य गुंतवणूकदारांकडे आहे. अशा परिस्थितीत शेअरच्या किमतीत मोठे चढ-उतार होण्याची शक्यता अधिक असते, कारण संस्थात्मक आधार नसतो.
तज्ज्ञ काय सांगतात?
बाजार विश्लेषकांच्या मते, कमी कालावधीत असामान्य तेजी आणि व्हॉल्युममध्ये अचानक वाढ दिसल्यास गुंतवणूकदारांनी अतिरिक्त सावधगिरी बाळगली पाहिजे. विशेषत: जेव्हा कंपनीत प्रमोटर किंवा संस्थात्मक गुंतवणूक कमी असते, तेव्हा किंमत कृत्रिमरीत्या हलवली जाण्याचा धोका वाढतो.
advertisement
गुंतवणूकदारांसाठी BSE चा सल्ला
  • केवळ अधिकृत स्त्रोतांवर विश्वास ठेवा
  • एक्सचेंजच्या वेबसाइटवरील खुलासे तपासा
  • नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या
  • “गारंटीड रिटर्न”च्या आमिषाला बळी पडू नका
BSE ने स्पष्ट केलं आहे की हा अलर्ट गुंतवणूकदारांच्या हितासाठी जारी करण्यात आला आहे. शेअर बाजारात निर्णय घेताना भावनिक प्रतिक्रिया किंवा सोशल मीडियावरील संदेशांवर अवलंबून राहू नये, तर अधिकृत माहिती आणि अभ्यासाच्या आधारेच गुंतवणूक करावी.
view comments
मराठी बातम्या/मनी/
तुमचे सर्व काही बुडेल, चुकूनही करू नका व्यवहार; बाजार बंद होताच BSEकडून नोटीस, शेअर्समध्ये संशयास्पद हालचाल
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement