महिलेची कॉलर पकडली, पतीला खाली पाडलं, बीडमध्ये शेतकरी दाम्पत्याला गुंडांकडून बेदम मारहाण, VIDEO समोर
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Beed: बीडमध्ये एका महिलेसह शेतकऱ्याला मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काही गावगुंडांनी ही मारहाण केली आहे. याबाबतचा व्हिडीओ समोर आला आहे.
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: मागील काही दिवसांपासून बीडमध्ये मारहाण आणि खूनाच्या विविध घटना समोर आल्या आहेत. याबाबतचे व्हिडीओज आणि फोटोज देखील अनेकदा व्हायरल झाले. अलीकडेच शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला १० ते १२ जणांनी रिंगण करून बेदम मारहाण केली होती. हे प्रकरण ताजं असताना बीडमध्ये एका महिलेसह शेतकऱ्याला मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काही गावगुंडांनी ही मारहाण केली आहे. याबाबतचा व्हिडीओ समोर आला आहे.
संबंधित व्हिडीओत आरोपी गावगुंड अश्लील शब्दात शिवीगाळ करत शेतकरी दाम्पत्याला मारहाण करताना दिसत आहे. यावेळी एका आरोपीनं महिलेला अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने महिलेच्या कॉलर पकडून तिचा विनयभंग देखील केला. तर इतर आरोपींनी महिलेच्या पतीला शेतात पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बीडच्या अंजनवती गावात घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणात श्रीमंत येडे यांच्या फिर्यादीवरून नेकनूर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जमीनीच्या वादातून ही मारहाण झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. शेतीची मशागत करताना किरकोळ वाद झाला. यानंतर या वादाचं रुपांतर मारहाणीत झाल्याचं सांगितलं जात आहे.
advertisement
याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. एकीकडे बीड जिल्ह्यात मारहाणीच्या विविध घटना घडत असताना अंजनवती गावात घडलेल्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बीडमध्ये आरोपींना कायद्याचा धाक उरला आहे का नाही? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
June 03, 2025 8:43 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
महिलेची कॉलर पकडली, पतीला खाली पाडलं, बीडमध्ये शेतकरी दाम्पत्याला गुंडांकडून बेदम मारहाण, VIDEO समोर


