'राम नवमीच्या मिरवणुकीवर हल्ला', भाजप नेत्याचा दावा, थेट VIDEO शेअर करत म्हणाले...

Last Updated:

पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार डॉ. सुकांत मजुमदार यांनी रात्री उशिरा एक्स अकाऊंटवर पोस्ट करत राम नवमी मिरवणुकीवर हल्ला झाल्याचा दावा केला आहे.

News18
News18
कोलकाता: पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार डॉ. सुकांत मजुमदार यांनी रात्री उशिरा एक्स अकाऊंटवर पोस्ट करत राम नवमी मिरवणुकीवर हल्ला झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर काही व्हिडीओ शेअर करत कोलकात्याच्या पार्क सर्कस सेव्हन पॉइंट परिसरात राम नवमीच्या मिरवणुकीवर हल्ला झाल्याचं म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ममता सरकार आणि राज्यातील पोलीस प्रशासनावर टीकास्त्र सोडलं. तसेच, हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचं त्यांनी म्हटलं.
भाजप खासदार सुकांतो मजुमदार यांनी X वर लिहिले की, 'रामनवमीची मिरवणूक परत येत असताना, कोलकात्याच्या पार्क सर्कस सेव्हन पॉइंट्स परिसरात हिंदू भाविकांवर क्रूर हल्ला करण्यात आला. केवळ भगवे झेंडे बाळगल्याबद्दल वाहनांवर दगडफेक करण्यात आली. यामुळे वाहनांच्या काचा फुटल्या. घटनास्थळी गोंधळ पसरला. हा पूर्वनियोजित हल्ला होता.'
पोलिसांवर निशाणा साधत सुकांतो मजुमदार पुढे म्हणाले की, जेव्हा हिंसाचार झाला, तेव्हा पोलीस कुठे होते? ती घटनास्थळी असूनही सगळं शांतपणे पाहत होती. ममता बॅनर्जी यांचे पोलीस दल पूर्णपणे निष्क्रिय झाले आहे. निष्पाप हिंदूंच्या संरक्षणासाठी एकही पाऊल उचलले गेले नाही. ही भ्याड निष्क्रियता एक गोष्ट सिद्ध करते की राम नवमीच्या वेळी एकत्रित बंगाली हिंदूंच्या गर्जनेने या व्यवस्थेला हादरवून टाकले आहे.
advertisement
advertisement
भाजप खासदाराने कोलकाता पोलिसांना टॅग करत पुढे लिहिले की, ही फक्त सुरुवात आहे. आम्ही कोलकात्याला वचन देतो की पुढच्या वर्षी पार्क सर्कसमधून अधिक मोठी, अधिक मजबूत आणि शक्तिशाली रामनवमीची मिरवणूक निघेल. आज जे पोलीस हातावर हात टाकून गप्प राहिले आहेत, तेच पोलीस उद्या आपल्यावर फुलांचा वर्षाव करतील. हे शब्द लक्षात ठेवा.
advertisement
त्याच वेळी, कोलकाता पोलिसांनी पार्क सर्कसमध्ये घडलेल्या कथित घटनेच्या संदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. तिथे कोणत्याही मिरवणुकीसाठी परवानगी घेण्यात आली नव्हती किंवा परिसरात अशी कोणतीही कृती घडली नव्हती. वाहनाचे नुकसान झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून सुव्यवस्था पूर्ववत केली. चौकशीसाठी गुन्हा दाखल केला जात आहे, लोकांना कोणत्याही अफवांवर लक्ष देऊ नका असा सल्ला देण्यात येत आहे.
मराठी बातम्या/क्राइम/
'राम नवमीच्या मिरवणुकीवर हल्ला', भाजप नेत्याचा दावा, थेट VIDEO शेअर करत म्हणाले...
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement