त्याने तिला खोलीवर बोलावलं, संध्याकाळी घरचे आले अन् रूममधलं दृश्य पाहून हादरले
- Published by:sachin Salve
Last Updated:
प्रशांतने मंगळवारी दुपारी ऐश्वर्या हिला खासबाग सर्कल जवळील ओळखीच्या घरात एकांतात बोलावून घेतलं. त्या ठिकाणी...
ज्ञानेश्वर साळुंखे, प्रतिनिधी
बेळगाव : प्रेम प्रकरणातून प्रियकराने प्रेयसीवर चाकू हल्ला करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना बेळगावात घडली आहे. एवढंच नाहीतर प्रेयसीची हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतःलाही चाकूने वार करून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेळगाव शहरातील खासबाग सर्कल जवळील शहापूर भागात घटना घडली. मयत ऐश्वर्या लोहार (वय 19, रा. नवी गल्ली शहापूर) असं मयत तरुणीचं नाव आहे. तरतिच्या प्रियकराचे नाव प्रशांत कुंडेकर (वय 29, रा. येळ्ळूर) असं आहे. प्रशांत आणि ऐश्वर्या यांचे गेल्या वर्षभरापासून प्रेम प्रकरण सुरू होतं. पण मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये कुठल्या तरी कारणावरून वाद सुरू होता. प्रशांतने मंगळवारी दुपारी ऐश्वर्या हिला खासबाग सर्कल जवळील ओळखीच्या घरात एकांतात बोलावून घेतलं. त्या ठिकाणी दोघांच्यात वादावादी होऊन त्याचे पर्यवसान प्रशांत कुंडेकरने धारदार चाकूने ऐश्वर्या हिच्यावर हल्ला केला. चाकूचा वार वर्मी लागल्याने घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळून ऐश्वर्याचा मृत्यू झाला. ऐश्वर्याची हत्या केल्यानंतर प्रशांत भानावर आला. आपल्या हातातून काय घडलं हे त्याला कळेना झालं. त्यानंतर त्याच चाकूने त्याने स्वतःवरही वार करून घेतले. अतिप्रमाणात रक्त स्त्रावर झाल्यामुळे त्याचाही तिथेच मृत्यू झाला.
advertisement
घरात रक्ताचा पाट
सायंकाळी जेव्हा घरातील मंडळी घरी परतली तेव्हा दार उघडून घरात प्रवेश करताच खोलीमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले ऐश्वर्या आणि प्रशांतचा मृतदेह आढळून आला. मृतदेह पाहून मोठा धक्का बसलेल्या घरच्या लोकांना तातडीने घटनेची माहिती शहापूर पोलिसांना दिली. शहापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून ऐश्वर्या आणि प्रशांतचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठवला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.
Location :
Belgaum,Karnataka
First Published :
March 04, 2025 11:00 PM IST