प्रेयसीवर संशय, तरुणाने काटाच काढला, दूध घेऊन जाणाऱ्या..., छ. संभाजीनगरला हादरवणाऱ्या घटनेत महत्त्वाचं अपडेट
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: संबंधित महिलेसोबत दुसऱ्या व्यक्तीचे प्रेमप्रकरण सुरू असल्याचा भोलाला संशय होता. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.
छत्रपती संभाजीनगर : प्रेम म्हणजे विश्वास, आपुलकी आणि समर्पण असते; पण जेव्हा त्याच प्रेमात संशय, राग आणि असहिष्णुता शिरते, तेव्हा त्याचे परिणाम अत्यंत भीषण ठरू शकतात. प्रेमप्रकरणातील अशाच संशयातून एका तरुणाने प्रेयसीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आली. न्यायालयाने या प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा सुनावली आहे.
दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध सुरू असल्याच्या संशयावरून प्रेयसीचा खून करणारा प्रियकर तथा आरोपी भोलाकुमार कुंजल मास्टर कुमार (वय 28, रा. उत्तर प्रदेश, ह.मु. मुकुंदवाडी) याला सत्र न्यायाधीश आर. डी. खेडेकर यांनी सोमवारी जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
advertisement
या प्रकरणात राहुल बरखू राय (रा. मुकुंदवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, राहुल हे कुटुंबासह मुकुंदवाडी येथे राहत होते. आरोपी भोलाकुमार देखील त्यांच्यासोबत राहात होता. घटनेतील महिलेसोबत भोलाचे प्रेमसंबंध होते. मात्र, संबंधित महिलेसोबत दुसऱ्या व्यक्तीचे प्रेमप्रकरण सुरू असल्याचा भोलाला संशय होता. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. एका वादानंतर भोलाने महिलेचा मोबाईल जाळून टाकला होता. ही बाब लक्षात येताच राहुलचा मोठा भाऊ सुनील याने भोलाला घर सोडण्यास सांगितले होते. त्यानंतर भोला स्वराजनगर येथे राहायला गेला.
advertisement
प्रेयसीने आपल्याला सोडल्याचा राग भोलाच्या मनात होता. याच रागातून 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी त्याने प्रेयसीला मारहाण केली. त्यानंतर ओढणीने गळा आवळून तिचा खून केला. खून केल्यानंतर मृतदेह गुंडाळून तो जवळच्या मैदानात आणून टाकण्यात आला. विशेष म्हणजे, संबंधित महिला घरी परत न आल्याने भोला स्वतः राहुलसोबत तिचा शोध घेत फिरत होता. दरम्यान, दुसऱ्या दिवशी पहाटे दूध घेऊन जात असलेल्या एका महिलेला मैदानात मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
advertisement
खटल्याच्या सुनावणीदरम्यान सहायक सरकारी लोकअभियोक्ता अरविंद बागूल यांनी एकूण 11 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यापैकी 3 साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची ठरली. सर्व पुरावे व साक्षी तपासल्यानंतर न्यायालयाने भादंवि कलम 302 अन्वये आरोपी भोलाकुमार याला जन्मठेपेची शिक्षा व 10 हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला अतिरिक्त तीन महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा भोगावी लागेल, असेही न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 20, 2026 11:21 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
प्रेयसीवर संशय, तरुणाने काटाच काढला, दूध घेऊन जाणाऱ्या..., छ. संभाजीनगरला हादरवणाऱ्या घटनेत महत्त्वाचं अपडेट










