पत्नीवर संशय, घटस्फोट मागितला..., पोलिसांचा 1800 किमी पाठलाग, संभाजीनगरच्या ‘त्या’ प्रकरणात धक्कादायक खुलासा
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: अमोल बारेला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यासाठी त्याला घटस्फोट हवा होता.
छत्रपती संभाजीनगर : बकवालनगर येथील हत्या प्रकरणात पोलीस तपासातून धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. अमोल एकनाथ बारे (30) यांची हत्या झाल्याप्रकरणी घटस्फोटाचा वाद कारणीभूत होता. या गुन्ह्यात एका अल्पवयीनासह चार आरोपींचा सहभाग असून, एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तब्बल 1800 किलोमीटरचा पाठलाग करून जालना येथे आरोपींना अटक केली.
नेमकं घडलं काय?
अमोल बारेला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यासाठी त्याला घटस्फोट हवा होता. अमोलची पत्नी आणि युवराजची पत्नी चुलत बहिणी असल्याने, युवराज दाम्पत्याने आपल्या पत्नीला घटस्फोटासाठी राजी करावे, असा अमोलचा आग्रह होता. मात्र पत्नीच्या नकारामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये वाद वाढत गेला.
advertisement
4 जानेवारी रोजी रात्री अमोलने युवराजला फोन करून शिवीगाळ व धमकी दिली. यामुळे संतप्त झालेल्या युवराजने प्रमोद वाकचौरे आणि शुभम राठोड यांना बोलावून घेतले. अमोलला दुचाकीवर बसवून ओअॅसिस चौक परिसरात नेण्यात आले. तेथे त्याला मारहाण करण्यात आली. या दरम्यान प्रमोदने धारदार चाकूने अमोलच्या छाती, गळा व पाठीत वार केले. गंभीर जखमांमुळे अमोलचा मृत्यू झाला.
advertisement
पोलिसांकडून 1800 किमी पाठलाग
view commentsघटनेनंतर आरोपी सतत ठिकाणे बदलत होते. नव्या सीमकार्डचा वापर करून मोबाइल लोकेशन लपवण्यात येत होते. पैसे संपल्याने जालना येथे रक्कम गोळा करून परराज्यात पळण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तांत्रिक विश्लेषण, मोबाइल लोकेशन व गोपनीय माहितीनुसार जालना, अहिल्यानगर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरसह 13 जिल्ह्यांत शोधमोहीम राबवण्यात आली. अखेर 1800 किलोमीटरचा प्रवास करून जालना बसस्थानक परिसरातून आरोपींना अटक करण्यात आली.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 1:07 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
पत्नीवर संशय, घटस्फोट मागितला..., पोलिसांचा 1800 किमी पाठलाग, संभाजीनगरच्या ‘त्या’ प्रकरणात धक्कादायक खुलासा










