गोंदिया हादरले! 38 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या; दोघांना अटक
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
एका अज्ञात युवकाची दगडांनी ठेचून हत्या करण्यात आलीय. हत्या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. मात्र हत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
रवी सपाटे, गोंदिया : गोंदिया शहर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मुर्री इथं मध्यरात्री एका तरुणाची दगडांनी ठेचून हत्या करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. शासकीय भारतीय खाद्य महामंडळ गोदामजवळ मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात 38 वर्षीय युवकाची दोन युवकांनी दगडाने ठेचून हत्या केली. या प्रकरणी गोंदिया शहर पोलिसांनी दोघांना अटक केलीय.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, एका अज्ञात युवकाची दगडांनी ठेचून हत्या करण्यात आलीय. हत्या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. मात्र हत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तसंच हत्या झालेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी गोंदिया शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.
हिंगोलीत भरदिवसा हत्या
हिंगोलीत भरदिवसा एकाची गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडला होता. आंबा चोंढी फाट्याजवळ घटना घडली. घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यातील मृताचे नाव राहुल गवळी असल्याचं समजते. दरम्यान, या हत्येचं कारण समजू शकलेलं नाही.
advertisement
छत्रपती संभाजीनगरमध्ये अपघातात एकाचा मृत्यू
view commentsछत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला. अपघातानंतर दुचाकीने पेट घेतल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पैठण शेवगाव मार्गावर पैठणच्या खुल्या जिल्हा कारागृहसमोर बस आणि दुचाकीच्या अपघात झाला. या अपघातामध्ये एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून अपघातानंतर दुचाकीने पेट घेतला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 24, 2024 2:09 PM IST


